Pune Porsche Accident Sarkarnama
पुणे

Pune Porsche Accident Case Accused : ...अखेर अल्पवयीन आरोपीचा बाल सुधारगृहातील मुक्काम 14 दिवसांनी वाढला!

Pune Car Accident latest News : बाल हक्क न्याय मंडळाच्या न्यायाधीशांनी हा निर्णय घेतला आहे. यामुळे दुसऱ्यांदा अल्पवयीन आरोपीचा बालसुधारगृहातील मुक्काम वाढला आहे.

Sudesh Mitkar

Pune Porsche Accident case Upadate : पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा बाल सुधारगृहातील मुक्काम 25 जूनपर्यंत वाढला आहे. बाल हक्क न्याय मंडळाच्या न्यायाधीशांनी हा निर्णय घेतला आहे. यामुळे दुसऱ्यांदा अल्पवयीन आरोपीचा बालसुधारगृहातील मुक्काम वाढला आहे.

गेल्या महिन्यामध्ये कल्याणी नगर परिसरामध्ये भीषण अपघात झाला होता. या अपघातात दोन तरुणांना जीव गमवावा लागला होता. एका बड्या बापाच्या अल्पवयीन मुलाने दारू पिऊन भरधाव वेगाने गाडी चालवत दोन जणांना चिरडल्याची घटना घडली होती.

या घटनेनंतर अत्यंत त्रोटक अशी शिक्षा देऊन अल्पवयीन आरोपीला सोडून देण्यात आल्यानंतर मोठ्या प्रमाणात जनतेमध्ये रोष पाहायला मिळाला. यानंतर पोलिसांनी तत्परता दाखवत तपासाला वेग देऊन या प्रकरणांमध्ये अटक सत्र राबवलं.

आतापर्यंत या प्रकरणांमध्ये अल्पवयीन आरोपीच्या आई-वडिलांना आणि आजोबांना अटक करण्यात आली आहे. आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याच्या आरोपावरून ससूनमधील दोन डॉक्टर देखील अटकेत आहेत. पोलिसांना या अपघात प्रकरणात रोज नवीन नवीन धागेदोरे हाती लागत असून त्यानुसार अजूनही पोलिसांकडून अटक सत्र सुरूच आहे.

सुरुवातीला हलक्यात सोडून देण्यात आलेल्या अल्पवयीन आरोपीला नंतर 14 दिवसांसाठी बालसुधारगृहात पाठवण्यात आलं होत. त्यानंतर पाच जूनला झालेल्या सुनावणी दरम्यान या अल्पवयीन आरोपीला 25 जून पर्यंत सुधार गृहात ठेवण्याचा निर्णय न्यायाधीशांनी घेतला होता. त्यानंतर आज झालेल्या सुनावणीमध्ये 25 जून पर्यंत ही मुदत वाढवण्यात आली आहे.

आज झालेल्या सुनावणी दरम्यान न्याय मंडळाचे नियमित मुख्य न्यायाधीश उपस्थित नव्हते. त्या जागी दुसऱ्या न्यायाधीशांनी सुनावणी घेतली. नियमित न्यायाधीश नसल्याने अल्पवयीन आरोपीबाबतचा निर्णय 25 जूनला घेण्यात येईल असं म्हणत न्यायालयाने कामकाज केलं स्थगित त्यामुळे अल्पवयीन आरोपी 25 जूनपर्यंत बाल सुधारगृहातच राहणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT