Pune PSI Suspended : Crime
Pune PSI Suspended : Crime Sarkarnama
पुणे

Pune PSI Suspended : आरोपीकडूनच 50 हजार उकळणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर निलंबनाची कारवाई !

सरकारनामा ब्यूरो

Pune PSI Suspended : गुन्हा दाखल असलेल्या आरोपीकडूनच तब्बल पन्नास हजार रूपये उकळणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. अरविंद शिंदे (PSI Arvind Shinde) असे निलंबित झालेल्या पोलीस उपनिरिक्षकाचं नाव आहे. पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात अरविंद शिंदे कार्यरत होते. डहाणूकर पोलिस चौकी येथे ते अधिकारी म्हणून काम पाहत होते. (Pune Police News)

आता लाच मागितल्याप्रकरणी आणि कामात कसूर केल्याबाबत त्यांनी निलंबित करण्यता आले आहे. अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग राजेंद्र डहाळे यांनी शिंदे यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. दि. ९ मार्च रोजी, त्यांनी निलंबनाबाबत आदेश काढले होते.

घराच्या मालकी हक्कसंबंधी पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यामध्ये परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणातील आरोपीला शिंदे यांनी फोन करून पोलीस चौकीत हजर राहण्यास सांगून, 50 हजार रूपये घेतल्याचे समोर आले होते. तसेच हे प्रकरण दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्याकडे तपासासाठी असताना, आरोपींना धाक दाखवून शिंदे यांनी पैसे घेतले. शिंदे यांच्यालर आपल्या अधिकारांचा गैरवापर केला, तसेच पोलीस विभागाची प्रतिमा खराब केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

अरविंद शिंदे यांनी पोलिस पदावर कार्यरत राहून, महाराष्ट्र नागरी सेवा कायद्यातील (Maharashtra Civil Service Act) तरतूदी व नियमांचा भंग केला आहे. यामुळे पोलीस विभागाची प्रतिमा खराब झाली आहे. शिंदे यांना आता निलंबनाच्या कारवाईनंतर त्यांना खासगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही, असे निलंबनाच्या कारवाईत सांगितले गेले आहे. अलंकार पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निलंबन काळातमध्ये खाजगी नोकरी किंवा धंदा करत नसल्याचे, प्रमाणपत्र द्यावे लागेल. असे प्रमाणपत्र दिल्यानंतरच त्यांना निर्वाह भत्ता दिला जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT