Ranjangaon MIDC Fake Notes Found Sarkarnama
पुणे

Pune News: पुण्यात बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश, दिल्ली कनेक्शन; एकाला अटक

Mangesh Mahale

Pune News: पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसीमध्ये पोलिसांनी बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. एमआयडीसी पोलिसांनी बनावट चलनांच्या छापखान्यावर छापा टाकला असून एकाला अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

शिरुरमध्ये बनावट चलनी नोटा तयार करणाऱ्या टोळीला रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. बनावट नोटांचे रॅकेट दिल्लीपर्यंत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. यावेळी बनावट नोटा घेण्यासाठी आलेल्या तरुणाला अटक केल्यानंतर बनावट नोटांचे रॅकेट रांजणगाव एमआयडीसी पोलीसांनी उघड केले.

शिरुर शहराजवळील रामलिंग रोडवर एका सदनिकेमध्ये बनावट नोटांच्या छापखान्यावर रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी छापा मारला आहे. त्या ठिकाणावरून नोटा बनविण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

याप्रकरणी मनीष अमरपाल याला अटक केली आहे. त्याच्याकडून पाचशे रुपयांच्या तीस हजार रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या आहेत. यावेळी आरोपी वास्तव्यास असणा-या सदनिकेमध्ये बनावट चलन तयार करण्यासाठी लागणारे साहित्य,कागद,कलर, प्रिंटर पोलिसांनी जप्त केले आहे. बनावट नोटांच्या रँकेटचे धागेदोरे दिल्लीपर्यत असल्याची शक्यता रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT