Ravindra Dhangekar  Ravindra Dhangekar
पुणे

Ravindra Dhangekar : माजी आमदार रवींद्र धंगेकर अडचणीत; बांधकाम व्यावसायिकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पुण्यात व्यावसायिक खलील शेख यांच्या मृत्यूनंतर रवींद्र धंगेकर, त्यांच्या पत्नीसह ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास स्वारगेट पोलीस करत असून आरोपींची बाजू अद्याप समोर आलेली नाही.

Hrishikesh Nalagune

पुणे : शिवसेना नेते, माजी आमदार रवींद्र धंगेकर, त्यांच्या पत्नी प्रतिभा, मनसेचे सरचिटणीस बाळासाहेब शेडगे यांच्यासह एकूण ११ जणांविरोधात पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांधकाम व्यावसायिक खलील रज्जुलाल शेख यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी सुलताना खलील शेख यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, त्यांचे पती खलील रज्जुलाल शेख (वय ६५) यांनी १५ जुलै रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. एफआयआरनुसार, २०२१ ते १५ जुलै २०२६ या कालावधीत सेंट्रिंग (बांधकाम) व्यवसायाशी संबंधित आर्थिक व्यवहारातून आरोपींनी खलील शेख यांना वारंवार धमक्या दिल्या, शिवीगाळ केली आणि मानसिक त्रास दिला. तसेच, आरोपी बाळासाहेब शेडगे यांनी खलील शेख यांच्या सेंट्रिंग व्यवसायाचे साहित्य जबरदस्तीने नेल्याचाही आरोप फिर्यादीने केला आहे.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, या सर्व प्रकारामुळे खलील शेख प्रचंड मानसिक तणावाखाली होते. आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून तसेच व्हिडिओ तयार करून संबंधित आरोपींची नावे नमूद केली. त्यानंतर राहत्या घरी सीलिंग फॅनला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या प्रकरणात रवींद्र धंगेकर, त्यांच्या पत्नी, बाळासाहेब शेडगे यांच्यासह इतर आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८(२), ३५१(२), ३५२(३) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास स्वारगेट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीपसिंह रिसाले करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT