PUNE city Name changing Sarkarnama
पुणे

Pune Name Change: पुण्याच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा एकदा आला समोर, राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाचं थेट फडणवीसांना पत्र

Pune News: पुण्यातील पुणे स्टेशनच्या नावावरून राजकीय वाद पाहायला मिळाला आहे. यापूर्वी संभाजी ब्रिगेड व नेत्यांकडून पुण्याचं नाव 'जिजापूर' किंवा 'जिजाऊ नगर' करावं, अशी मागणीही समोर आली होती. सुजात आंबेडकर यांनी पुण्याचं नाव बदलून 'छत्रपती संभाजीनगर' करावं, अशी मागणी केली आहे.

Deepak Kulkarni

Nagpur News : राज्यातील छत्रपती संभाजीनगर,अहिल्यानगर,ईश्वरपूर असं काही प्रमुख शहरांचं नामांतर करण्यात आले आहेत. यानंतर गेल्या काही वर्षांपासून पुणे शहराचंही नाव बदलण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यातच आता राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चानं या मागणीसंबंधीचं थेट मुख्यमंत्र्‍यांनाच पत्र लिहिलं आहे.

राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नागपुरात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन आणि पत्र त्यांना दिलं आहे. या पत्राद्वारे पुणे शहराचे नाव बदलून 'फुले नगर' करण्यात यावं अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.

महात्मा जोतिबा फुले यांचं द्विशताब्दी वर्ष म्हणून आगामी 2027 हे वर्ष साजरे केले जाणार आहे. तसेच महात्मा फुलेंच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी पुणे शहराचं नाव बदलून फुलेनगर असं करण्यात यावं असं म्हटलं आहे. या मागणीनंतर आता पुन्हा एकदा नामांतराचा मुद्दा चर्चेत येण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारने पुणे शहराच्या नामांतराबाबतचा ठराव लवकरात लवकर मंजूर करावा,अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे करण्यात आली आहे. तसेच यावेळी राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चानं महात्मा जोतिबा फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी ही करण्यात आली आहे. यासंबंधीचं मागणीपर निवेदन आणि पत्र देण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी फडणवीसांची भेट घेतली होती.

राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चातर्फे करण्यात आलेल्या मागण्या पुणे शहराचे नाव फुलेनगर नामांतराचा ठराव, तसेच त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्याचा प्रस्ताव या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. तसेच विधीमंडळाचे एक दिवसीय विशेष अधिवेशन महात्मा फुलेंवर चर्चा बोलावण्यात यावे. प्रागतिक कृति व प्रबोधनकरी संस्था व व्यक्तिस 'सत्यशोधक भुषण पुरस्कार' देण्याचे उपक्रम सुरू करावे,सर्व विद्यापीठात महात्मा फुले अध्यासन वर्ग सुरु करावे यांसारख्या मागण्यांचाही उल्लेख मुख्यमंत्री फडणवीसांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.

संभाजी ब्रिगेड व नेत्यांकडून पुण्याचे नाव 'जिजापूर' किंवा 'जिजाऊ नगर' करावे, अशी मागणीही समोर आली होती, ज्यावर विविध संघटनांनी आक्षेप नोंदवला होता. पुण्यातील पुणे स्टेशनच्या नावावरून राजकीय वाद पाहायला मिळाला आहे. पुण्यातील पुणे स्टेशनच्या नावावरून अनेकदा नामांतराची मागणी आणि राजकीय वाद पेटल्याचं सातत्यानं दिसून आलं आहे.

पुण्यातील पुणे स्टेशनच्या नावावरून राजकीय वाद पाहायला मिळाला आहे. यापूर्वी संभाजी ब्रिगेड व नेत्यांकडून पुण्याचं नाव 'जिजापूर' किंवा 'जिजाऊ नगर' करावं, अशी मागणीही समोर आली होती. सुजात आंबेडकर यांनी पुण्याचं नाव बदलून 'छत्रपती संभाजीनगर' करावं, अशी मागणी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT