Anti-Corruption Bureau  Sarkarnama
पुणे

Pune ACB: हवेली तालुक्यात एकाच वेळी तीन लाचखोर महिला तलाठी ACBच्या जाळ्यात;घराची झाडाझडती सुरु

Anti-Corruption Bureau officials caught three female talathis from Haveli taluka: सांगरून, बहुली, खडकवाडी आणि कुडजे गावाच्या हद्दीतील जमिनीच्या सातबारा तसेच आठ अ उताराचे संगणकीकृत तसेच हस्तलिखित साक्षांकित प्रत तक्रारदारांना हव्या होत्या

Mangesh Mahale

  1. हवेली तालुक्यातील तीन महिला तलाठ्यांना ACB ने लाच घेताना पकडलं.

  2. सातबारा व ८ अ उताऱ्यांसाठी त्यांनी लाचेची मागणी केली होती.

  3. गुन्हा खडक पोलीस ठाण्यात नोंदवला असून तपास शैलजा शिंदे करत आहेत.

संगणकीकृत सातबारा व आठ अ उतारा, हस्तलिखित सातबारा देण्यासाठी सरकारी शुल्काच्या व्यतिरिक्त अधिक रक्कमेची मागणी करणाऱ्या तीन महिला तलाठींवर पुणे लाचलुचपत विभागाने कारवाई केली आहे. त्यांना लाच स्वीकारताना पकडले आहे. त्यांच्या घराची झाडाझडती सुरु आहे.

तीनही तलाठी या पश्चिम हवेलीतील आहेत.त्यांच्यावर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगरूण,बहुली व खडकवाडी-कुडजे या गावातील या तीन महिला तलाठी आहेत. त्यांच्याविरोधात लाचलुचपत विभागाकडे तक्रार देण्यात आली होती. तक्रारदार हे जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात.

सांगरून, बहुली, खडकवाडी आणि कुडजे गावाच्या हद्दीतील जमीन खरेदी विक्री करण्यासाठी पुणे शहराच्या लगतच्या प्रस्तावित रिंग रोड मध्ये अधिग्रहित झालेल्या जमिनीच्या सातबारा तसेच आठ अ उताराचे संगणकीकृत तसेच हस्तलिखित साक्षांकित प्रत तक्रारदारांना हव्या होत्या. त्यासाठी ते तीनही गावाच्या तलाठ्यांना भेटले होते.

तक्रारदार यांना हव्या असलेल्या प्रतीसाठी सरकारी शुल्काशिवाय या तीनही तलाठ्यांनी सुमारे 2 हजार ते 12 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदारांच्या माहितीवरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तीनही महिला तलाठ्यांना लाच घेताना पकडले. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे तपास करीत आहेत.

कोण आहेत या तलाठी

  1. शारदादेवी पुरूषोत्तम पाटील (वय 40, तलाठी खडकवाडी कुडजे, हवेली, पुणे रा.ठि.सर्व्हे न. 57/1, कृष्णकुंज सोसायटी, मोरे वस्ती, मांजरी बुद्रुक, पुणे )

  2. प्रेरणा बबन पारधी (वय 30, तलाठी सांगरूण, हवेली पुणे रा ठि. फ्लॅट न. 7s, 2/4A, जी सोसायटी, गुलमोहर पार्कजवळ, पाषाण, पुणे)

  3. दिपाली दिलीप पासलकर (वय 29 , तलाठी बहुली,हवेली, पुणे रा.ठि. लेन न.4, स्वामी समर्थनगर, कोंढवा, काकडेनगर, पुणे 48)

FAQ

Q1. महिला तलाठ्यांनी किती रक्कमेची लाच मागितली?
👉 प्रत्येकी 2 हजार ते 12 हजार रुपयांची मागणी केली होती.

Q2. कारवाई कुठे झाली?
👉 हवेली तालुक्यातील सांगरूण, बहुली आणि खडकवाडी-कुडजे गावांमध्ये.

Q3. या प्रकरणाचा तपास कोण करत आहे?
👉 पोलिस निरीक्षक शैलजा शिंदे, पुणे लाचलुचपत विभाग.

Q4. गुन्हा कुठे नोंदवला आहे?
👉 खडक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT