Rahul Gadhi
Rahul Gadhi Sarkarnama
पुणे

Rahul Gandhi News : मोठी बातमी ! पुणे सत्र न्यायालयाचा राहुल गांधींना दणका; 'या' प्रकरणी दिला मोठा आदेश

Sachin Waghmare

Congress News : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या अडचणीत येत्या काळात वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे सत्र न्यायालयाने राहुल गांधींना मोठा दणका दिला आहे. लंडन येथील भारतीय लोकांसमोर भाषण करताना राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत अपमान केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे लंडन येथील भाषणात केलेल्या वक्तव्यांच्या विरोधात पुण्यात खटला दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणात विनायक दामोदर सावरकर यांचे नातू सात्यकी अशोक सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात (Rahul Gandhi) दाखल केलेल्या तक्रारीत प्रथमदर्शनी सत्य असल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले. त्यावरून राहुल गांधींना 19 ऑगस्टला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश पुण्यातील सत्र न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशानंतर राहुल गांधी स्वतः उपस्थित राहतात की वकिलामार्फत बाजू मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. (Rahul Gandhi News)

लंडन येथील भारतीय लोकांसमोर भाषण करताना राहुल गांधींनी मार्च 2023 मध्ये भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात वक्तव्य केले होती. त्यामुळे पुणे पोलिसांनी याबाबतचा प्राथमिक रिपोर्ट न्यायालयात दाखल केला होता.

त्यानंतर पोलिसांनी अहवाल सादर केल्यानंतर न्यायालयाने काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी यांना सीआरपीसी कलम 204 अंतर्गत नोटीस बजावली होती. सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी पुणे सत्र न्यायालयात मानहानीची याचिका दाखल केली होती. त्यानंतर पुण्यातील विश्रामबाग पोलिसांना न्यायालयाने या प्रकरणाचा अधिक तपास करण्याचे आदेश दिले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

19 ऑगस्टला प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश

या प्रकरणी कोर्टाने राहुल गांधींना 19 ऑगस्टला प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहण्याचे आदेश पुण्यातील सत्र न्यायालयाने कलम 204 अन्वये दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणात येत्या काळात राहुल गांधी न्यायालयाच्या या आदेशानंतर स्वतः उपस्थित राहतात की वकिलामार्फत बाजू मांडतात हे पहावं लागेल.

तक्रार दाखल

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये या प्रकरणात न्यायालयात सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर (Satyaki Sawarkar) यांनी धाव घेतली होती. भारतीय दंड संहिता (IPC) कलम 499 आणि 500 ​​(मानहानी) अंतर्गत तक्रार दाखल केली होती. या दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत प्रथमदर्शनी सत्य असल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले. यावेळी न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, राहुल गांधी आता पुणे सत्र न्यायालयात हजर होणार आहेत का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

SCROLL FOR NEXT