Crime  Sarkarnama
पुणे

Pune Sexual Abuse Case : पुण्यातील लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर, शाळेवर प्रशासकाची नियुक्ती

सरकारनामा ब्यूरो

Pune Sexual Abuse Case : बदलापूर प्रकरणानंतर शाळा परिसरात होणाऱ्या लैंगिक अत्याचाराची अनेक प्रकरणे समोर येत आहे. पुणे शहरात मध्यवस्तीत असलेल्या शाळेत देखील अल्पवयीन विद्यार्थीवर अत्याचार झाल्याचा प्रकार उघड झाला होता. त्यामुळे एकच खळबळ उठाली होती.

या प्रकरणी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी तक्रार असलेल्या शाळेवर प्रशासकांची नेमणूक केली आहे. घडलेल्या प्रकराबाबत प्रशासक तपास करून पुढील कारवाई करण्यात येईल, असे सांगितले जात आहे.

पुण्यातील कराची एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत लैंगिक अत्याचार प्रकार घडला होता. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापक व संचालक यांच्याकडे तक्रार केली होती.मात्र, या तक्रारची दखल घेण्यात आली नव्हती. त्यांच्याकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप होता. अखेर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दखल घेत शाळेवर प्रशासक नेमला आहे.

उपशिक्षणाधिकारी आस्मा मोमीन यांची शाळेच्या प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर एस.ए.टेमगिरे आणि विस्तार अधिकारी सुधीर चटणे यांची सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सातवीमध्ये असलेल्या विद्यार्थीनीने शाळेत ठेवलेली बॅग आणण्यासाठी वरच्या मजल्यावर गेली होती. त्यावेळी शाळेतच शिकत असलेल्या 19 वर्षाच्या मुलाने विद्यार्थ्यानीवर अत्याचार केला. या प्रकरणी मुलीची आईने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केले आहे.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT