Dharashiv Zilla Parishad elections: महानगरपालिका निवडणुकीच्या निकालामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांच्या विजयामुळे खळबळ उडाली आहे. पुण्या सारख्या शहरात चक्क तुरुंगात असलेल्या उमेदवारांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती उतरल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात चाललंय तरी काय? असा प्रश्न पडला आहे.
जाहीर सभांमध्ये गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांच्या उच्चाटनाची भाषा करणारे काही नेते प्रत्यक्षात अपप्रवृत्तींना राजाश्रय देत असल्याचा आरोप होत असताना तेच स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना तिकीट देत आहेत. गुन्हेगारी जगतातून थेट राजकारणात होणारी ही एन्ट्री चर्चेचा विषय ठरली आहे.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत माजी नगरसेवक स्वर्गीय वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली आंदेकर यांनी शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांचा पराभव केला. तर लक्ष्मी आंदेकर यांनी भाजपच्या ऋतुजा गडाळे यांचा अटीतटीच्या लढतीत पराभव केला.
हत्या प्रकरणात सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तर गजा मारण्याच्या पत्नी जयश्री मारणे यांना देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली होती. त्याच्या पत्नीचा निवडणुकीत पराभव झाला आहे. गजा मारणे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. गज्या मारणे टोळीचा 'शार्प शुटर' म्हणून ओळख असलेला एक डॉन थेट जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्याला शिवसेनेते तिकीट दिले आहे,.
मारणे टोळीचा 'शार्प शुटर' सुनील बनसोडे हा तुळजापूर तालुक्यातील शहापूर जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात आहे. मारणे टोळीचा 'उजवा हात' आणि टोळीतील 'टॉप हँड' म्हणून बनसोडे हा ओळखला जातो. त्याच्यावर विविध गुन्ह्याची नोंद आहे. अनेक वर्षांपासून फरार असलेल्या बनसोडेला पुणे पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी वारजे माळवाडी येथून अटक केली होती.
बनसोडे हा पु्ण्याच्या गुन्हेगारी विश्वात सक्रिय असला तरी गावाकडे त्याचा उपद्रव नसल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. गुन्हेगारी जगतातून थेट राजकारणात होणारी ही एन्ट्री चर्चेचा विषय ठरली आहे. सुरुवातीला बनसोडे याने भाजपकडूनही उमेदवारी अर्ज भरला होता; मात्र भाजपने यावेळी 'सेफ कार्ड' खेळत पाऊल मागे घेतल्याचं बोललं जातं. बनसोडेने अपक्ष, भाजप आणि शिवसेना अशा तिन्ही मार्गांनी अर्ज भरले होते. मात्र शिवसेनेने त्याच्यावर विश्वास दाखवला आहे.
बनसोडे सध्या पुण्यात स्थायिक असून, काटी हे मूळ गाव आहे. तो शहापूर गटातून 'धनुष्यबाण' चिन्हावर निवडणूक लढवत आहे. येथे अशोक जाधव (राष्ट्रवादी –शरद पवार गट), कचरू सगट (शिवसेना उबाठा) आणि लिंगय्या स्वामी असे एकूण चार उमेदवार रिंगणात आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.