Pune News: पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.परभणी जिल्ह्यातील गंगाखेड मतदारसंघाचे रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte) यांचा नातू गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता झाला असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
पिंपरी चिंचवड पोलिस (Police) ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या भाचीचा मुलगा सुमित भागवत गुट्टे (वय 24)हा 1 जानेवारीपासून बेपत्ता झाला आहे. त्यामुळे गुट्टे कुटुंबात एकच खळबळ उडाली आहे.सुमित हा बुधवारी सकाळी 9 वाजता ज्यूपिटर हॉस्पिटल येथे मुलाखतीसाठी जात असल्याचं सांगत घराबाहेर पडला होता. त्यानंतर तो आजपर्यंत घरी परतलेला नाही.
दोन तासांमध्ये घरी परत येतो असं म्हणून सुमित गुट्टेनं सांगितल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे. त्याच्याशी घरच्यांचं फोनवर शेवटचं संभाषण हे 1 जानेवारीला दुपारी तीन वाजता झालं होतं. त्यानंतर त्याचा फोन बंद आहे,अशी माहिती आमदार रत्नाकर गुट्टे यांनी दिली असून याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांकडे तक्रार दिल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
गुट्टे म्हणाले, सध्या मी एका वेगळ्याच दु:खात असून माझा नातू मिसिंग आहे. माझा नातू मिसिंग असल्यामुळे मला शनिवारी(ता.4)परभणीमध्ये झालेल्या सर्वपक्षीय आक्रोश मोर्चातही सहभागी होता आले नाही. माझा नातू एक जानेवारीपासून मिसिंग आहे. माझ्या भाचीनं त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला,मात्र त्याचा फोन बंद असल्याचंही ते म्हणाले.
त्याचवेळी त्यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याची माहितीही दिली आहे.एक जानेवारीला त्याच्याशी दुपारी तीन वाजून तीन मिनिटांनी अखेरचं बोलणं झालं होतं.मात्र,तेव्हापासून तो बेपत्ता असून या प्रकरणात पिंपरी-चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे असंही आमदार गुट्टे यांनी यावेळी म्हटलं आहे.
भाजप आमदार सुरेश धसांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा म्हणून परभणीत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आलेल्या मोर्चात आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या अनुपस्थितीवर भाष्य केलं होतं.त्यावर प्रतिक्रिया देताना नातू बेपत्ता असल्यामुळे आपण मोर्चात सहभागी झालो नव्हता असा खुलासा केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.