Clock symbol controversy NCP: पुणे महापालिका निवडणुकीनंतर आज स्थायी समिती अध्यक्ष पदाची निवडणूक झाली. महापालिकेत भाजपचं प्रचंड असं बहुमत असल्याने अध्यक्ष हा भाजपचाच असणार हे निश्चित होतं. भाजपाकडून श्रीनाथ भिमाले यांना अध्यक्ष पदाचा अर्ज दाखल केला होता. आणि त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार देखील दिला होता.
मात्र ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह हे घड्याळ आहे. त्या राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीत वेळ पाळली नसल्याचा समोर आले आणि त्याचा फटका स्थायी समितीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला बसला असल्याचे पाहायला मिळाले.
आज महापालिका अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे , नगरसचिव योगिता भोसले यांच्यासह स्थायी समिती सदस्य उपस्थित मध्ये स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुहास टिंगरे यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र टिंगरे यांनी एक मिनिट उशिरा अर्ज दाखल केला असल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश खडके यांनी छाननी मध्ये टिंगरे यांचा अर्ज विहित मुदतीनंतर आल्याने ते अवैध असल्याचं सांगितलं. त्यामुळे भिमाले यांचा एकच अर्ज राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने वेळ न पाळल्याने त्याचा फटका बसल्या असल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे.
स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेस कडून महापौर आणि उपमहापौर पदासाठी देखील उमेदवार देण्यात आले होते. मात्र नंतर या उमेदवारांनी माघार घेतल्याने भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले.
त्यामुळे स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकी वेळ देखील अर्ज माघारी घेण्याची नामुष्की ओढवू नये यामुळे नियोजन पूर्वक अर्ज दाखल करताना एक मिनिटाचा उशीर करण्यात आला असल्याची चर्चा सध्या पालिका वर्तुळात आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीच्या संगणमतानेच हा उशीर करण्यात आला का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.