Pune News, 27 Mar : पुण्यातील स्वारगेट बसस्थानकातील अत्याचार प्रकरणातील पीडित तरूणीने राज्याच्या सचिवांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात तिने पुणे पोलिसांवर (Pune Polis) खळबळजनक आरोप केले आहेत. तर आरोपी दत्ता गाडेने आपल्यावर दोनदा बलात्कार केल्यानंतर त्याला तिसऱ्यांदा अनैसर्गिक कृत्य करायचं होतं.
मात्र, मी तीव्र विरोध केल्याने तो पळून गेल्याचंही तिने म्हटलं आहे. पीडितेने सचिवांना लिहिलेल्या पत्रात आरोप केला आहे की, या प्रकरणाची चौकशी सुरू झाली तेव्हा माझी इच्छा नसताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वैद्यकीय चाचणी केली. शिवाय पुरुष पोलिस (Police) अधिकारीही माझी चौकशी करत होते, असा आरोप तिने केला आहे.
तसंच माझ्या चारित्र्यावर संशय व्यक्त करणारी आणि आरोपीची बाजू घेणारी काही वक्तव्य राजकीय नेत्यांनी केली आहेत. त्यामुळे माझी बदनामी थांबवावी आणि अशा वक्तव्यांवर बंदी घालावी अशी मागणी पोलिस आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र, या मागणीला त्यांनी काहीही दाद दिली नसल्याचं या तरूणीने म्हटलं आहे.
तर यावेळी या प्रकरणी नियुक्ती करण्यात आलेले विशेष सरकारी वकील अजय मिसर यांच्याबद्दल आत्ताच आक्षेप घ्यायचा नाही. मात्र त्यांच्यावर आक्षेप घेता येईल अशी माहिती आपल्याकडेच उपलब्ध असल्याचा दावा तिने केला आहे. दरम्यान, आपण विशेष सरकारी वकील म्हणून असीम सरोदे (Asim Sarode) यांची नियुक्ती करावी अशी मागणी केली होती.
मात्र पुणे (Pune) पोलिसांनी तुला यायला एक दिवस उशीर झाला असं सांगितलं. याचा अर्थ अन्यायग्रस्त मुलगी म्हणून माझ्या म्हणण्याला काहीच महत्त्व नाही असा कायदा आहे का? असा सवालही या पीडितेने उपस्थित केला आहे.
तर पीडितेने तिच्यावर बलात्कार झाल्यावर आरडाओरडा केला. मात्र माझा आवाज खोल गेल्यामुळे आवाजच निघत नव्हता शिवाय त्याचवेळी माझ्या मनात बलात्काराच्या विविध घटनांमध्ये विरोध केल्याने मुलींची हत्या केलेल्या गोष्टी मनात आल्यामुळे मी जीव वाचवणे महत्त्वाचे मानल्याचंही म्हटलं आहे.
तर आरोपीने दोनदा बलात्कार केल्यानंतर तिसऱ्यांदा त्याने जबरदस्तीचा प्रयत्न केल्यावर मी पूर्ण ताकदीने विरोध केला. कदाचित दोनदा लैंगिक अत्याचार केल्याने त्याने सुद्धा माघार घेतली आणि तो पळून गेला, असंही या पीडितेने म्हटलं आहे. त्यामुळे आता सचिव या पत्राची दखल घेणार का? आणि संबंधित पोलिसांवर कारवाई करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.