Pune News, 27 Feb : पुण्यातील स्वारगेट बसस्थानकातील शिवशाही बसमध्ये (Pune Swargate ST Stand) तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा पुण्यातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
याच अत्याचाराच्या घटनेवरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांसह पोलिसांवर सटकून टीका केली आहे. शिवाय राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे.
माध्यमांशी बोलताना राऊतांनी (Sanjay Raut) फडणवीसांना आव्हान दिलं, ते म्हणाले, "माझं गृहमंत्र्यांना आव्हान आहे की आपण राजकीय कामासाठी विरोधकांना त्रास देण्यासाठी गृह खात्याचा वापर करता त्याचा वापर तुमच्या लाडक्या बहिणींच्या सुरेक्षेसाठी केला तर महाराष्ट्रावर उपकार होतील."
तसंच पोलिसांवर दबाव आहे आणि ते देखील दबाव असल्याचं मान्य करतात. पुण्यातील प्रकरण हे निर्भया प्रकरणासारंखं आहे. सुदैवाने कालच्या घटनेतील मुलीचे प्राण वाचले. या घटनेनंतर काल ज्या शिवसैनिकांनी आंदोलन केलं. त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत.
माझं पोलिस आयुक्तांना आव्हान आहे. पुण्यात (Pune) मोकाट सुटलेल्या ज्या गँग्स आहेत, त्यांना कायद्याची भिती राहिलेली नाही. माझं गृहमंत्र्यांना आव्हान आहे. राजकीय कामासाठी गृह खात्याचा वापर करता त्याचा वापर तुमच्या लाडक्या बहिणींच्या सुरेक्षेसाठी केला तर महाराष्ट्रावर उपकार होतील.
महिलांच्या सुरक्षेसाठी केलेला शक्ती कायदा पुढे येऊ नये म्हणून सरकारमध्ये कोणी फिक्सर बसले आहेत? की महिलांचे खुन आणि अत्याचार करून पुजा चव्हाण प्रकरणातील जे लोक सरकारमध्ये बसले आहेत. त्यांच्यापर्यंत कायद्याचे हात पोहोचतील म्हणून कोणाला भीती वाटतेय का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
शिवाय यावेळी त्यांनी सत्ताधारी पक्षातल्या महिला नेत्यांवर जहरी टीका केली. ते म्हणाले, "सत्ताधारी पक्षातील महिला नेता इतरवेळी रस्त्यावर उतरलेल्या दिसतात. मात्र पुण्यात झालेल्या घटनेवर त्यांनी थातुरमातूर प्रतिक्रिया दिली. या ठिकाणी जर दुसर कोणी असतं, महाविकास आघाडीतील तर याच महिलांनी मंत्रालयाच्या दरात गोंधळ घातला असता."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.