Pune Vidhan Sabha Election Sarkarnama
पुणे

Pune News : विजयाचा कॉन्फिडन्स! पुण्यात निकालापूर्वीच फोडले फटाके

Election confidence Crackers burst in Pune before results: कुठे अभिनंदननाचे पोस्टर तर कुठे निकालापूर्वीच फोडले फटाके, नेत्यांचा कॉन्फिडन्स खरा ठरणार ? की ओव्हर कॉन्फिडन्स हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

Sudesh Mitkar

Pune Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली असून आता निकालाकडे सर्वांचेच डोळे लागले आहेत. मात्र निकालाला एक दिवस बाकी असतानाच विजयाचा भारीच कॉन्फिडन्स असलेल्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी कुठे आपल्या नेत्यांची विजय रॅली काढली. तर कुठे नवनिर्वाचित आमदार म्हणून अभिनंदननाचे पोस्टर लावल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे या नेत्यांचा हा कॉन्फिडन्स खरा ठरणार का ? की ओव्हर कॉन्फिडन्स हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये मतदारांनी बाहेर पडत चांगल्या संख्येने मतदान केल्याचं पाहायला मिळालं. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी चांगली असल्याचं पाहायला मिळालं. पुणे जिल्ह्यातील टक्केवारीचा विचार केल्यास तब्बल 61.5% इतकं मतदान झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे ही वाढलेली टक्केवारी कोणाचा ठोका चुकवणार याबाबत सध्या चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहेत.

पुणे शहराचा विचार केल्यास कसबा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 58.76% इतकं मतदान झालं आहे. 2019 च्या निवडणुकांमध्ये या ठिकाणी 51 टक्के मतदान झालं होतं. तर शहरात सर्वाधिक कमी मतदान हे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात झाला आहे.

यंदा 50.90 इतकं मतदान शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात (Vidhan Sabha Constituency) झाला आहे. मात्र हे मतदान गेल्या वेळेच्या टक्केवारीच्या तुलनेत जास्त असल्याचं पाहायला मिळत आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात 44% मतदान झालं होतं.

त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत वाढलेल्या टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र अद्याप तरी सर्वत्र सामने हे अटीतटीचे असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच शिवाजीनगर, कोथरूड ,पर्वती आणि खडकवासल्यातील उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना मात्र आपल्या नेत्याचा विजय निश्चित असल्याचं वाटत आहे.

मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर खडकवासला विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP) उमेदवार सचिन दोडके यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. दोडके यांना खांद्यावर घेत फटाके फोडत निकालापूर्वीच विजय जल्लोष करण्यात आला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मतदार संघाच्या परिसरात आमदार पदी निवड झाल्याबद्दल दोडके यांचे अभिनंदन चे पोस्टर देखील लावले आहेत.

पर्वती विधानसभा मतदारसंघात देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार अश्विनी कदम यांची आमदार पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनचे पोस्ट लावण्यात आले आहे. गेल्या निवडणुकीत मोठ्या मतांच्या फरकाने पराभूत झालेल्या अश्विनी कदम यांच्या कार्यकर्त्यांना यंदा मात्र विजयाचा कॉन्फिडन्स असल्याचं दिसत आहे. मात्र हा कॉन्फिडन्स खरा ठरणार की ? हा ओव्हर कॉन्फिडन्स होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Uddhav Thackeray Shivsena News

त्यासोबतच कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार सिद्धार्थ शिरोळे त्यांचे फोटो असलेले पोस्टर भाजपा नेते सनी निह्मण यांनी लावले आहेत. या पोस्टरमध्ये अखंड विकासाचे कमळ फुलले असा आशय घेण्यात आला आहे. तसंच विधानसभा निवडणुकीतील महाविजायाबाबत या नेत्यांचे अभिनंदन देखील करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT