Pune Assembly Election Sarkarnama
पुणे

Pune Assembly Election : प्रचार संपला! छे छे पुण्यात अजूनही प्रचार सुरूच ?

Pune Vidhan Sabha News : पुण्यात छुप्या प्रचाराचा नवा ट्रेंड, पक्षाच्या ब्रीदवाक्यातून सांकेतिक प्रचार सुरूच आहे. निवडणूक आयोगाच्या नजरेत न येता आयोगाने घालून दिलेल्या बंधनांना सोयीस्कर रित्या वळून सध्या प्रचार सुरू आहे.

Sudesh Mitkar

Pune News : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता सोमवारी सायंकाळी झाली आहे. आता उद्या (बुधवारी) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र प्रचाराची वेळ संपल्यानंतर देखील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांकडून वेगवेगळ्या ट्रिक अवलंबण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. निवडणूक आयोगाच्या नजरेत न येता आयोगाने घालून दिलेल्या बंधनांना सोयीस्कर रित्या वळून सध्या प्रचार सुरू आहे. असाच पुण्यात प्रचाराचा नवा ट्रेंड सध्या दिसून येत आहे.

निवडणूक आयोगाने (Election Commission) दिलेल्या निर्देशानुसार काल संध्याकाळी ६ पर्यंतच राज्यातील उमेदवारांना प्रचार करण्याची परवानगी होती. त्यानुसार काही ठिकाणी उमेदवारांनी आणि पक्षांनी प्रचाराचा शेवट जाहीर सभा घेऊन केला. तर काही ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रचाराची सांगता करण्यात आली.

प्रचाराचा अवधी जरी संपला असला तरी मतदान पूर्वीचे राहिलेले काही तास निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जातात. चुकीच्या शेवटच्या काही तासांमध्ये घडणाऱ्या घडामोडी मतदानाचा ट्रेंड बदलण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात असा उमेदवारांचा विश्वास असतो. या काळामध्ये मतदारांना लुभावण्यासाठी पैशाचा देखील वापर केला जातो असा आरोप सातत्याने उमेदवारांकडून होताना पाहायला मिळतो. त्यामुळे प्रचार संपल्यानंतर मतदानाच्या दिवसापर्यंत मोठ्या प्रमाणात माया लोकांपर्यंत पोचवली जात असल्याचं बोललं जातं.

चौका चौकात देखील यंदाच्या निवडणुकीमध्ये मताला काय भाव चाललाय याबाबतच्या चर्चा ऐकायला मिळतात. यंदाच्या चर्चांमध्ये पर्वती विधानसभा मतदारसंघ, वडगाव शेरी आणि कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार (Vidhan Sabha Election) संघातील झोपडपट्ट्यांमधील मताचा भाव चांगलाच वधारला असल्याच्या चर्चा चौकांमध्ये चघळल्या जात आहेत.

एकीकडे आर्थिक गणिताची गोष्ट होत असताना दुसरीकडे शेवटच्या क्षणापर्यंत मतदारांमध्ये पक्ष आणि उमेदवार पोचवण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या क्लुप्त्या आखल्या जात आहेत. त्यानुसार पुण्यातील काही चौकांमध्ये फ्लेक्स ची उभारणी करण्यात आली आहे.

या फ्लेक्स वर कोणत्याही पक्षाचे चिन्ह, उमेदवारच नाव, कोणत्याही नेत्याचा फोटो नाही मात्र पक्षांची ब्रीदवाक्य वा प्रचाराची लाईन लिहिण्यात आली आहे. जेणेकरून निवडणूक आयोगाच्या नियमांना बायपास करून निवडणूक प्रचार शेवटच्या क्षणापर्यंत सुरू ठेवता येईल असा यामागे उद्देश असल्याचं बोललं जात आहे

त्यामुळे प्रचाराची वेळ उलटून गेल्यानंतर सुद्धा उमेदवारांकडून सांकेतिक प्रचार अजूनही सुरूच असल्याचं निदर्शनास येत आहे.त्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी लागलेल्या या फ्लेक्सवर निवडणूक आयोग काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT