Vote Counting Sarkarnama
पुणे

Pune Vote Chori: पुण्यातही वोट चोरी? ठाकरेंच्या वकिलांनी समोर आणलं सीसीटीव्ही फुटेज: सरकारी कार्यालयाला आतून कडी...

Pune PMC Election Vote Chori Asim Sarode cctv-footage: पुण्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पुण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वोट चोरी होत असल्याचा मुद्दा समोर आणला आहे. यासाठी त्यांनी पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय मधील एक सीसीटीव्ही समोर आणला आहे.

Sudesh Mitkar

Pune News: गेल्या काही दिवसांपासून देशभरामध्ये वोट चोरीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. हाच मुद्दा महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील महाविकास आघाडीने लावून धरला आहे.

अशातच आता पुणे महापालिका निवडणुकीमध्ये वोट चोरी होत असल्याचा दावा करत महाविकास आघाडीचे नेते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सुप्रीम कोर्टामध्ये भूमिका मांडणारे वकील असीम सरोदे यांनी केला आहे. यासाठी त्यांनी एक सीसीटीव्हीचा व्हिडीओ देखील समोर आणला आहे.

आगामी महापालिका निवडणुकांसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. या प्रारूप मतदार यादीवर प्रचंड मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. लवकरच अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. मात्र त्यापूर्वी पुण्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पुण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वोट चोरी होत असल्याचा मुद्दा समोर आणला आहे. यासाठी त्यांनी पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय मधील एक सीसीटीव्ही समोर आणला आहे.

याबाबत काँग्रेसचे नेते संजय बालगुडे, शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख गजानन थरकुडे आणि वकील असीम सरोदे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी संजय बालगुडे, असीम सरोदे म्हणाले, भाजप नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेचा क्षेत्रीय कार्यालयात जात मतदार याद्या बदलल्या आहेत. मतदार याद्यामध्ये भाजपने मोठा घोळ केला आहे.

भाजप पदाधिकारी जिथे या मतदार याद्या ठेवले आहेत तिथे जाऊन त्या मतदार याद्या चाळताना आढळून आले आहेत. याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज आपल्याकडे असून तब्बल ४.३० तास क्षेत्रीय कार्यालयात बसून भाजपच्या नेत्यांनी मतदार याद्या बदलल्या असल्याचा दावा करण्यात आला आहे.

संजय बालगुडे म्हणाले, "आमच्याकडे सगळे पुरावे आहेत, सरकारी कार्यालयातील एका ऑफिसमध्ये दाराला कडी लावून बंद खोलीत बसून कार्यकर्त्यांनी या याद्या बदलल्या आहेत.

सगळे व्हिडिओ आमच्या हाती लागले आहेत.भवानी पेठेत असणाऱ्या कार्यालयात हा घोळ झाला असून शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयात भाजपने अस केलं आहे. भाजपाला अनुरूप असे मतदारांचे गट्टे आपल्या प्रभागामध्ये ठेवून इतर विरोधात जाणारी मतं इतरत्र टाकण्यात अली आहेत.आमच्याकडे ४.३० तसाच रेकॉर्ड आहे.सलग ४.३० तास हे लोक त्या खोलीमध्ये होते,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT