Pune News: पुणे जिल्हा परिषदेचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक गजानन पाटील यांच्या हस्ते सादर करण्यात आला. हा अर्थसंकल्प एकूण ३०१ कोटी रुपयांचा आहे. मागील वर्षाच्या मूळ अंदाजपत्रकापेक्षा ९ कोटी रुपये अधिक आहे.
या अर्थसंकल्पात शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. महात्मा फुले यांची २००वी जयंती लक्षात घेता शिक्षण विभागाला अधिक प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे. शिक्षण क्षेत्रात पहिली ते आठवी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आत्मसात करण्यासाठी 'कौशल्य सेतू' कार्यक्रम राबवला जाणार आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांना भविष्यातील तंत्रज्ञानासाठी सज्ज करण्यावर भर देण्यात आला आहे.
स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार दोन सायन्स पार्क उभारले जाणार आहेत. स्किल सेंटर सुरू करण्यात येणार आहे.दिव्यांग व्यक्तींसाठी 'दिव्यांग स्वावलंबन योजना' आणि एकल महिलांसाठी 'माझे अस्तित्व' योजना सुरू केली जाणार आहे.
विद्यार्थ्यांच्या मानसिक व बौद्धिक वाढीसाठी ध्यान आणि योगसाधना कार्यक्रम सुरू होईल.तसेच पर्यावरणासाठी सोलर पार्क उभारून 'गावचा सूर्य, गावची वीज' निर्मितीचे ध्येय ठेवले आहे.
जिल्हा परिषद शाळांतील ६वी-७वी इयत्तेतील विद्यार्थ्यांना इस्रो (५० मुले), नासा (२५ मुले) आणि युरोपियन स्पेस सेंटर (२५ मुले) येथे वैज्ञानिक सहल घेऊन जाण्याची योजना आहे. प्रत्येक तालुक्यातील एक उत्कृष्ट जिल्हा परिषद शाळेचे सीबीएसई संलग्नीकरण करण्याचा प्रस्ताव आहे.
शिक्षकांसाठी 'ग्लोबल गुरुजी' योजना राबवून ५० उत्कृष्ट शिक्षकांना फिनलंड आणि सिंगापूरसारख्या देशांमध्ये आंतरराष्ट्रीय शिक्षण पद्धतीचा अनुभव घेण्याची संधी मिळेल. महिलांसाठी 'फिरते शॉपी' आणि 'सावित्री कॅफे' योजना सुरू करण्यात येणार आहे.या अर्थसंकल्पामुळे ग्रामीण भागातील शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सशक्तीकरण आणि पर्यावरण संरक्षणाला चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.