Voters at a polling booth during Pune Zilla Parishad elections as turnout declines in Baramati amid mourning, while exit polls project strong NCP performance across the district. Sarkarnama
पुणे

Pune ZP Election : अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीत मतदानाचा निरुत्साह, सर्वात कमी मतदान; समीकरणे बदलणार?

Baramati Voting Percentage : अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत मतदानात मोठी घट दिसून आली असली तरी एक्झिट पोलनुसार पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे.

Sudesh Mitkar

Ajit Pawar Death Impact Pune ZP News : पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत सरासरी 69 टक्के मतदान झाले असून, 2017 च्या तुलनेत फक्त 1.11 टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे. मात्र, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बालेकिल्ला असलेल्या बारामती तालुक्यात यावेळी मतदानात लक्षणीय घट झाली आहे.

28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या शोकमय वातावरणामुळे अनेक मतदारांनी मतदान टाळले असावे, असे दिसून येत आहे. त्यामुळे बारामतीच्या निवडणुकीवर दुःखाची चादर असल्याचे बोलेले जात आहे. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार, बारामतीत एकूण 54.90 टक्के मतदान झाले. 2017 मध्ये येथे सुमारे 61 टक्के मतदान होते, म्हणजे यावेळी 6-7 टक्क्यांची घट दिसून येते.

अजित पवारांच्या निधनामुळे मतदारांमध्ये निरुत्साह दिसून आला. तरीही निवडणूक शांततेत पार पडली. मतमोजणी 9 फेब्रुवारी 2026 रोजी होणार असून, निकालानंतरच पूर्ण चित्र स्पष्ट होईल. बारामतीच्या या कमी मतदानाने स्थानिक राजकारणात नवे संकेत काय आहेत हे पाहणे महत्वाचे ठरणार आहेत.

दरम्यान एक्झिट पोल नुसार राज्यात भाजप महापालिका निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषदेतही नंबरचा वनचा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. पण राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतरही पुणे झेडपीत राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारत सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचा अंदाच 'एक्झिट पोल'मधून समोर आलेल्या आकड्यांवरुन दिसून येत आहे.

पुणे जिल्ह्यातील तालुकानिहाय सरासरी मतदान टक्केवारी (प्राथमिक आकडेवारी):

  • वेल्हे: 79.30 टक्के (सर्वाधिक)

  • मावळ: 77.43 टक्के

  • शिरूर: 75.69 टक्के

  • खेड: 75.46 टक्के

  • भोर: 75.62 टक्के

  • हवेली: 68.02 टक्के

  • पुरंदर: 68.37 टक्के

  • आंबेगाव: 65.30 टक्के

  • इंदापूर: 65.67 टक्के

  • दौंड: 65 टक्के

  • मुळशी: 63.79 टक्के

  • जुन्नर: 61.18 टक्के

  • बारामती: 54.90 टक्के (सर्वात कमी)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT