BJP leader Sangram Thopte reacts after his wife Swarupa Thopte defeats NCP leader Ranjit Shivtare in the Pune Zilla Parishad election, sparking political buzz in Bhor. Sarkarnama
पुणे

Sangram Thopte : 'बाईनं पाडलं... बाईनं' : अजितदादांचा व्हिडीओ स्टेटसला ठेवत संग्राम थोपटेंनी रणजीत शिवतारेंना डिवचलं

Pune Zilla Parishad Result : पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे रणजीत शिवतारे यांचा पराभव भाजपच्या स्वरूपा थोपटे यांनी केला असून, त्यानंतर सोशल मीडियावरून सुरू झालेल्या डिवचण्यानं भोरचं राजकारण तापलं आहे.

Sudesh Mitkar

Pune ZP Result : पुणे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये 51 जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व राखले आहे. असं असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही दिग्गजांना पराभवचा सामना करावा लागला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे भोरमधील नेते आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत शिवतारे यांचा देखील समावेश आहे.

रणजीत शिवतरे हे भोरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा चेहरा मानले जातात. यंदा त्यांना दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करण्याचा शब्द देखील दिला असल्याचं सांगितलं जात होतं. अशा बड्या नेत्याचा पराभव काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या पत्नीने केला आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर हे या ठिकाणी विजयी झाले. शंकर मांडेकर यांच्या विजयामध्ये रणजीत शिवतारे यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वाचपा काढण्याच्या दृष्टिकोनातून यंदा शिवतारे यांच्या विरोधात थेट संग्राम थोपटे यांनी आपल्या पत्नीला रिंगणामध्ये उतरवलं होतं.

ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आणि अटीतटीची झाली. या निवडणुकीदरम्यान रणजीत शिवतारे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल केला होता. अभिनेते रितेश देशमुख यांच्या चित्रपटातील एक डायलॉग टाकण्यात आला होता. "लक्षात ठेव संग्राम, या चेहऱ्याने तुझी झोप नाही उडवली तर रणजीत शिवतारे नाव नाही सांगणार" हा डायलॉग त्या व्हिडिओमध्ये वापरण्यात आला होता.

याच व्हिडिओला संग्राम थोपटे यांनी जोड देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका भाषणा दरम्यान 'बाईंनी पाडलं' असं वक्तव्य केलं होतं. त्या भाषणाची जोड देत संग्राम थोपटे यांनी रणजीत शिवतारे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप नेते संग्राम थोपटे यांच्या पत्नी स्वरूपा थोपटे या जिल्हा परिषद निवडणूकीत विजयी झाल्यानंतर, संग्राम थोपटे यांनी हे डिवचणार व्हाट्सअप स्टेटस ठेवलं आहे.

तसेच स्वरूपा थोपटे विजयी झाल्यानंतर कार्यकर्त्यांकडूनही जल्लोषादरम्यान 'बाईनं पाडलं.. बाईनं..' अशा आशयाचे बॅनर झळकवण्यात आले होते. त्यानंतर आता संग्राम थोपटे यांनीही अशा प्रकारचं डिवचणारे व्हाट्सअप स्टेटस ठेवल्याने भोरमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असं राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT