सणसवाडी : शिरुरमधून सणसवाडी-कोरेगाव भीमा हा एकमेव जिल्हा परिषद गट महिलेसाठी राखीव आणि वडगाव रासई-मांडवगण गट अनुसूचित जमातीसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे वडगाव गटातील राष्ट्रवादीच्या विद्यमान जिल्हा परिषद सदस्या सुजाता अशोक पवार या पुणे जिल्हा परिषदेत (pune zp election) जाण्याची हॅट्रीक साधणार का ? अशी चर्चा सध्या सुरु आहे.
सुजाता पवार (सुजाता भाभींची) (Sujata Pawar) यांना थेट सणसवाडी-कोरेगाव भीमा गटातून उभे राहण्यासाठी राष्ट्रवादीने जोरदार तयारी केली आहे. दोन दिवसांपासून सुजाता पवार यांना राष्ट्रवादीच्या निमंत्रणाने सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. विद्यमान पंचायत समिती सभापती मोनिका हरगुडे, माजी सरपंच सुनंदा दरेकर व स्नेहल भुजबळ या तिघींनीही सुजाता पवारांच्या उमेदवारीचे स्वागत केले आहे.
तीन दिवसांपूर्वी जिल्हा परिषद गटांची पुनर्रचना होताना शिरुरमध्ये एक गट वाढला आणि त्यात दोन गट अनुसूचित जमातीसाठी राखीव होताना एकच गट महिलेसाठी आरक्षित राहिला. सुजाता भाभी यांचा वडगाव-मांडवगण जिल्हा परिषद गट अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्याने भाजपाच्या गटात प्रचंड उत्साह आहे. राष्ट्रवादीला ही संधी दिसली अन त्यांनी महिलेसाठी एकमेव आरक्षित ठरलेल्या सणसवाडी-कोरेगाव भिमा या गटातून त्यांना जिल्हा परिषदेत पाठविण्याची तयारी सुरू केली.
हा गट विद्यमान पंचायत समिती सभापती मोनिका हरगुडे यांच्यासाठी जिल्हा परिषदेत जाण्यासाठी संधीचा असताना त्यांनीही या उमेदवारीचे स्वागत केल्याने हा गट निवडणूक जाहीर होण्याआधीपासूनच चर्चेत आला आहे.सलग दोन वेळा वडगाव-रासई मांडवगण गट गाजविलेल्या भाभींची जिल्हा परिषदेत जाण्याची हॅट्रीक सणसवाडी-कोरेगाव भिमा गटातून होणार का याची उत्सूकता या निमित्ताने निर्माण झाली आहे.
सुजाता पवार यांच्या चर्चेत आलेल्या या मतदार संघात सभापती मोनिका हरगुडे, माजी सरपंच सुनंदा दरेकर व स्नेहल राजेश भुजबळ या तीन इच्छुकांसह डिंग्रजवाडीचे माजी सरपंच उद्योजक राहूल गव्हाणे यांच्या पत्नी दिपाली गव्हाणे या चार उच्चशिक्षित इच्छुक उमेदवार आहेत. आमच्याकडे राष्ट्रवादीस तोडीस तोड उमेदवार असून तो योग्य वेळी जाहीर करणार असल्याचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.