Ajit Pawar
Ajit Pawar sarkarnama
पुणे

पुणेकरांनो नियम पाळा; अन्यथा निर्बंध आणखी कडक करू

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पुणे शहर व जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी चिंताजनक स्थिती नाही. रुग्ण गंभीर होण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण खूप कमी आहे.त्रा, संसर्ग वेगाने वाढत असल्याने पुणेकरांनी कोरोना प्रतिबंधासाठीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शनिवारी पुणेकरांना केले. नियम पाळत नसल्यानेच शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नियम पाळा, अन्यथा आठवडाभरानंतर कोरोनाचे निर्बंध आणखी कडक केले जातील, असा गंभीर इशारा पवार यांनी दिला.

राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधासाठी जाहीर केलेल्याच नियमावलीची सध्या पुणे शहर व जिल्ह्यात अंमलबजावणी केली जात आहे.आणखी आठवडाभर सरकारचीच नियमावली लागू राहील. तुर्तास त्यात कोणताही बदल नाही. परंतु रुग्णवाढीचा आताचाच वेग कायम राहिल्यास, पुढील आठवड्यात कठोर निर्णय घेतला जाईल, असे पवार यांनी स्पष्ट केले.

पवार म्हणाले, ‘‘कोणत्याही परिस्थितीत शहर व जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करा. कोरोना लसीकरण वाढवा, शाळा-शाळांमध्ये १५ ते १७ या वयोगटातील विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण करा, पुरेसा औषधसाठा, आवश्यक त्या सोयींनी युक्त रुग्णवाहिका, ऑक्सिजनयुक्त खाटांची उपलब्धता करून आरोग्य व्यवस्था सक्षम होण्याच्या दृष्टीने उपाययोजना गतीने करा.’’

कोरोना टाळण्यासाठी हे करा

नागरिकांनी गर्दीत जाणे टाळावे

गरज असेल तरच घराबाहेर पडा

प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळा

सामाजिक अंतराचे पालन करा

मास्क, सॅनिटायझरचा नियमित वापर करा

रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका

लक्षणे दिसताच,डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

कोरोना प्रतिबंधासाठीच्या संभाव्य उपाययोजना

गरज भासल्यास सीओईपी येथील जम्बो हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने चालू करणार

पिंपरी चिंचवडमधील जम्बो कोविड हॉस्पिटल पुन्हा सुरु करणार

सार्वजनिक व राजकीय, खासगी कार्यक्रमांवर बंदी घालणार

मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींना प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड करणार

रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना एक हजार रुपयांचा दंड

राहिलेल्या व्यक्तींचे गतीने लसीकरण करणार

शालेय विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी शाळांमध्ये लसीकरणाची सोय करणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT