purushottam patil criticize trupti desai
purushottam patil criticize trupti desai 
पुणे

तृप्ती देसाईंना नको त्या भानगडी करायची हौस!

सरकारनामा ब्युरो

पुणे: "त्या तृप्ती देसाईला नको त्या भानगडी करायची हौस आहे. मध्यंतरी शनीमंदिरात जाऊन म्हणाली महिलांना दर्शन मिळाले पाहिजे. तू मशिदीत जाऊन म्हण ना महिलांना दर्शन द्या. तिकडं जात नाही आणि हिकडं का येते ?"असा सवाल कीर्तनकार पुरुषोत्तम पाटील यांनी तृप्ती देसाई यांना विचारला आहे.

"तू किर्तन करणाऱ्या लोकांच्या मागे लागली आहेस. जेव्हा हिंगणघाटमध्ये एका नराधमाने त्या तरुणीला पेट्रोल टाकून जाळले तेव्हा तू झोपली होतीस की कुंभमेळ्याला गेली होतीस?"असेही त्यांनी म्हटले आहे.

निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्यावर टीका करणाऱ्या देसाई यांच्यावर पाटील यांनी नारायणडोह येथील कीर्तनात बोलताना हा सवाल केला आहे.

"जो बोलतो त्याच्याच चुका होतात. गाडी चालवतो त्याचाच अपघात होतो. लांबून बघतो त्याला काही होत नाही. इंदोरीकर यांच्या एका वाक्यावर टीका करणाऱ्या तृप्ती देसाई जर खरोखर महिलांच्या विषयात लढत असेल तर पंधरा दिवसापूर्वी हिंगणघाट येथे एका शिक्षिकेला जाळून मारले तेव्हा तृप्ती कोठे होती ? झोपली होती कि कुंभमेळ्याला गेली होती ?"असा सवाल त्यांनी विचारला.

"मोठे घोटाळे करणाऱ्या राजकीय नेत्याला पुन्हा पक्षात घेतले जाते. मोठी पदे दिली जातात. मग इंदोरीकर महाराज यांनी असा काय गुन्हा केला? त्यांना एवढं टार्गेट केले जातेय ?जे काम सरकारला जमले नाही ते इंदोरीकर यांनी केले आहे. देसाईसारख्या लोकांच्यामुळे जर इंदुरीकर यांना कीर्तन बंद करावे लागले तर महाराष्ट्र पेटून उठेल, "असा इशारा पाटील यांनी दिला आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT