Baburap Pacharne and Rahul Pachrane Sarkarnama
पुणे

शिरुरच्या राजकारणात पुन्हा ट्विस्ट : राहुल पाचर्णे जिल्हा बॅंकेच्या मैदानातून बाहेर

आमदार अशोक पवार विरुध्द निवृत्तीआण्णा गवारे अशी थेट लढत

भरत पचंगे,शिक्रापूर

शिक्रापूर : जिल्हा बँकेच्या निवडणूकीत अर्ज छाननीच्या दिवशी काही धक्के बसण्याची शक्यता वर्तवली जात होती. यातील एक धक्का बसला आहे तो माजी आमदार आणि भाजपचे जेष्ठ नेते बाबूराव पाचर्णे (Baburap Pacharne) यांना. सोसायटी संचालकाचा दाखला न जोडल्याने पाचर्णे यांचे चिरंजीव राहुल पाचर्णे (Rahul Pacharne) यांचा अर्ज आज बाद ठरवण्यात आला आहे. त्यामुळे याठिकाणी आता आमदार अशोक पवार (Ashok Pawar) विरुध्द ७५ वर्षीय जेष्ठ संचालक निवृत्तीआण्णा गवारे अशी थेट लढत होणार आहे.

बाबुराव पाचर्णे यांचा चिरंजीव राहुल यांनी पवार विरुद्ध गवारे यांच्या लढतीमध्ये उडी घेत जिल्हा बॅंक निवडणूकीत ट्विस्ट आणला होता. मात्र पाचर्णे यांच्या पात्रता निकषात त्यांचा केवळ सोसायटी सभासद दाखलाच जोडण्यात आला होता. वास्तविक अर्ज भरतेवेळी सोसायटी संचालक असल्याचा दाखला आवश्यक होता. याबाबत आक्षेप घेतल्यानंतर पाचर्णे यांनी आपण आता व्हॉट्सअपवर सोसायटी संचालकपदाचा तर काही वेळात हार्ड कॉपीमध्ये दाखला जमा करत असल्याचे सांगितले.

मात्र निवडणूक विभागाने ही पाचर्णे यांची मागणी नामंजुर केली, आणि त्यांचा अर्ज बाद ठरवला. पर्यायाने शिरुर अ वर्ग मतदारसंघात आता गवारे-पवार हीच रंगतदार लढत होणार हे निश्चित झाले आहे. मात्र यातही पाचर्णे यांनी प्रतिक्रिया देताना केलेल्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. त्यामुळे अर्ज बाद झाला तरी शिरुरमध्ये पुढे काय घडामोडी घडणार याकडे नजरा लागल्या आहेत.

या सगळ्या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना राहुल पाचर्णे म्हणाले, या निवडणूकीत मी अर्ज भरणे ही एक रणनिती होती. माझा अर्ज बाद करण्यासाठी विरोधकांनी ज्या काही हलचाली केल्या त्याबद्दल मी काही बोलणार नाही. आता याबाबत दाद मागायची की आणखी काय करायचे ते भाजपचे सर्व पदाधिकारी मिळून ठरवतील. मात्र एकच सांगतो, शिरुर जिल्हा बॅंक अ वर्ग मतदार संघात लढत रंगतदार होणार हे नक्की.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT