Raj Thackeray in Pune, MNS Hanuman Chalisa pathan in Pune, Pune MNS Latest News
Raj Thackeray in Pune, MNS Hanuman Chalisa pathan in Pune, Pune MNS Latest News Sarkarnama
पुणे

राज ठाकरे दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी पुण्यात दाखल; हनुमान जयंतीनिमित्त महाआरती

सरकारनामा ब्यूरो

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) हे दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी पुण्यात (Pune) दाखल झाले आहेत. मुंबई, ठाण्यानंतर ते आता पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांना काय संदेश देतात, याकडे राज्याचे लक्ष असणार आहे. मनसेच्या वतीने उद्या (ता. १५ एप्रिल) हनुमान जयंतीनिमित्त पुण्यात महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. ठाकरे यांच्या हस्ते ही महाआरती होणार आहे. तसेच, अजान आणि हनुमान चालिसा वादामुळे पक्षातून बाहेर पडणाऱ्या मुस्लीम कार्यकर्त्यांची राज ठाकरे कशी समजूत घालणार, हेही पहावे लागणार आहे. (Raj Thackeray arrives in Pune for Maha Aarti organized on occasion of Hanuman Jayanti)

राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यातील कुमठेकर रस्त्यावरील खालकर चौकात असणाऱ्या मारुती मंदिरात ही महाआरती होणार आहे. शनिवारी (ता. १६ एप्रिल) सायंकाळी सहा वाजता ही महाआरती होणार आहे. तसेच, या वेळी हनुमान चालिसाचे सामूहीक पठणही करण्यात येणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भातही राज हे कार्यकर्त्यांना संदेश देणार आहेत. (Pune MNS Latest News)

गुढी पाडव्याच्या मुंबईतील सभेत राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यासंदर्भात भूमिका जाहीर केली होती. ज्या वेळी भोंग्यावरून अजान देण्यात येईल, त्यावेळी मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसाचे पठण करा, असा आदेश दिला होता. त्यानंतर ठाण्यातील सभेत राज यांनी राज्य सरकरला ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवा. त्यानंतर आमचा तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही, असे सांगितले होते. त्यामुळे पुण्यात हनुमान जयंतीला राज ठाकरे यांच्या भोंगाविरोधातील आंदोलनाचा श्रीगणेशा होणार असल्याची चर्चा पुण्यात सुरू झाली आहे.

राज ठाकरे यांच्या भूमिकेवरून मनसे आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये आरोपाच्या जोरदार फैरी सुरू आहेत. त्यामुळे पुण्यातील कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. पुण्यातील सर्व हनुमान मंदिरांमध्ये जयंतीच्या तयारीला वेग आलेला असताना आता याच दिवशी राज ठाकरे हे पुण्यात आहेत, त्यामुळे हनुमान चालिसा आंदोलनाची सुरुवात पुण्यात होणार हे नक्की झाले आहे. दरम्यान, याच भूमिकेमुळे मनसेतील मुस्लीम कार्यकर्ते पक्षातून बाहेर पडत आहेत, त्यामुळे पक्षाबाहेर जाणाऱ्या कार्यकर्त्यांची ते कशी समजूत घालतात, हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT