Vasant More, Raj Thackeray
Vasant More, Raj Thackeray sarkarnama
पुणे

MNS Pune : मनसेचा वसंत मोरेंना पुन्हा धक्का! समर्थक पदाधिकाऱ्याची हकालपट्टी

सरकारनामा ब्यूरो

MNS Pune : मनसेच्या माथाडी कामगार सेनेचे पुणे (Pune) जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे (Nilesh Mazire) यांची मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पदावरुन हकालपट्टी केली असल्याचं समोर आलं आहे. याबाबतची माहिती मनसे नेते शिरीष सावंत (Shirish Sawant) यांनी दिली आहे. तर माझिरे यांना पदावरून हटवण्यात आल्याचं एक पत्र देखील मनसे अधिक़ृत या ट्विटरवरून शेअर करण्यात आलं आहे.

निलेश माझिरे यांची पदावरुन हकालपट्टी करण्यात आल्यामुळे मनसे (MNS) पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. तर याआधी देखील राज ठाकरे यांनी पुणे दौरा केला होता. त्यावेळीही मनसेतील अंतर्गत वाद आणि नाराजीचे सुर दिसून आले होते. तर काही दिवसांपूर्वी वसंत मोरे (Vasant More) यांनी देखील पक्षातील अंतर्गत कलहाबाबत नाराजी व्यक्त केली होती.

निलेश माझिरे हे वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यामुळे वसंत मोरेंना पुन्हा एकदा धक्का बसला असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. तर निलेश माझिरे यांनी काही दिवसांपूर्वी मनसे सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र वसंत मोरे यांनी शिवतीर्थावर निलेश माझिरे यांची राज ठाकरे यांच्याशी (Raj Thackeray) भेट घडवून आणत त्यांची नाराजी दूर केली होती. त्यानंतर निलेश माझिरे यांना पुन्हा माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष पद देण्यात आले होते. मात्र आता पुन्हा त्यांची मनसे माथाडी कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदावरून हाकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मनसे मधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT