Maharashtra CM Devendra Fadnavis responds to Raj Thackeray’s remarks on Hindi by citing the National Education Policy.  Sarkarnama
पुणे

Devendra Fadnavis on Raj Thackeray : राज ठाकरेंसोबत काय झाली चर्चा, त्यांचा आग्रह काय? फडणवीसांनी सगळं क्लिअर केलं...

Raj Thackeray’s Opposition to the Hindi Language : शाळेमध्ये हिंदीची सक्ती करण्यावरून देवेंद्र फडणवीस म्हणाले, हिंदी आधी अनिवार्य केली होती. परंतु, मंगळवार काढलेल्या जीआरनुसार ही अनिवार्यता काढून टाकण्यात आली आहे.

Sudesh Mitkar

Pune News : हिंदी भाषेच्या मुद्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्र सरकारकडून पहिलीपासून हिंदी सक्तीची केली जात असल्याचा करत त्यांनी कडाडून विरोध केला आहे. त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. राज ठाकरेंसोबत याबाबत आपली चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले.

शाळेमध्ये हिंदीची सक्ती करण्यावरून सध्या राजकारण आपल्याच पाहायला मिळत आहे. याबाबत फडणवीस म्हणाले, हिंदी आधी अनिवार्य केली होती. परंतु, मंगळवार काढलेल्या जीआरनुसार ही अनिवार्यता काढून टाकण्यात आली आहे. नव्या जीआरमध्ये सांगितले की, कुठलीही तिसरी भाषा तुम्हाला शिकता येणार आहे.

नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषा अनिवार्य करण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त दोन भाषा शिकता येणार असून त्यात एक भारतीय भाषा असणार आहे. आपल्याकडे इंग्रजी स्वीकारतात, त्यामुळे हिंदीचा विषय आपल्याकडे होता, पण आता हिंदीची सक्ती काढून टाकण्यात आली आहे, असेही फडणवीसांनी स्पष्ट केले.

कुठलीही भारतीय भाषा तिसरी भाषा म्हणून शिकता येणार आहे. त्यासाठी 20 विद्यार्थी असले तरी शिक्षक शिकवणार आहेत. ऑनलाईन पद्धतीने देखील शिकवणार आहेत. आपण सगळे लोक इंग्रजीचा पुरस्कार करतो आणि भारतीय भाषांचा तिरस्कार करतो, हे योग्य नाही. भारतीय भाषा इंग्रजीपेक्षा चांगली नाही, असेही फडणवीस म्हणाले.

इंग्रजी ही व्यवहार भाषा झाली आहे. आता आपण अभियांत्रिकीही मराठीत शिकवत आहोत. डॉक्टर आणि एमबीएचे विद्यार्थी सुद्धा मराठीतून शिकत आहेत. नवीन शिक्षण धोरणाने मराठीला वैश्विक, ज्ञानभाषा आणि अर्थकारणाची भाषा बनण्याचे दार उघडे केले आहे. हे सरकारने स्वीकारले आहे, असे फडणवीसांनी सांगितले.

कुठल्याही शाळेत मराठीला पर्याय नाहीत. हिंदीला पर्याय दिलेले आहेत, असे सांगत फडणवीस म्हणाले, माझी राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली आहे. त्यांचा आग्रह आहे की, दोनच भाषा असल्या पाहिजेत, तिसरी भाषा लादू नका. पण केंद्र सरकारने तीन भाषांचे सूत्र आणले आहे. देशात तीन भाषांचे सूत्र आहे. त्यामुळे महाराष्ट्र दोन भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नाही.

तीन भाषांच्या सूत्राविरोधात तामिळनाडू कोर्टात गेले आहे. कोर्टाने ते मान्य केले नाही. आपल्या देशातील एक अधिकची भाषा शिकण्यात गैर काय आहे? आपल्या भाषेला डावलले गेले तर वेगळी गोष्ट आहे. मात्र, आपली भाषा शिकत असताना आपली मुले आणखी एक भाषा शिकत असतील तर, त्याही भाषेचे ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहचेल. तीन भाषेबाबत केंद्र सरकारने नाहीतर देशातील तज्ञ यांनी बसून हे धोरण तयार केले, असे फडणवीसांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT