Raj Thackeray
Raj Thackeray sarkarnama
पुणे

मशिदीवरील भोंगे काढा ; मनसेचा पोलिसांना चार दिवसांचा अल्टीमेटम

सरकारनामा ब्युरो

पुणे : गुढीपाडवा मेळाव्यात मुंबईत शिवाजी पार्क येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरुनही आक्रमक भूमिका घेतली. राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे पुण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद असल्याचे उघड झाले आहे.

मशिदीतील भोंगे (Mosque Loudspeaker) काढण्यावरुन आता पुण्यात मनसेच्या नेत्यांमध्ये वाद निर्माण झाल्याचे चित्र आहे. मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत संबुस यांनी आता आक्रमक भूमिका घेत मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढण्याबाबत पोलिसांना (pune police) पत्र दिले आहे. मनसेनं पोलिसांचा चार दिवसांच्या अल्टिमेटम दिला आहे.

पुणे शहर मनसेकडून शहरातील पोलीस ठाण्यांना पत्र पाठविले आहे. डेक्कन परिसरातील सर्व मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढण्याबाबत मनसेने पत्र दिले आहे. याबाबत विश्रामबाग, फरासखाना पोलीस ठाण्यालाही मनसेनं पत्र दिल आहे. ''चार दिवसात मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढा, अन्यथा दुप्पट पटीने स्पीकर लावून हनुमान चालीसाचे पठण करणार,'' असा इशारा मनसेनं दिला आहे.

मनसेच्या मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक हिंदूत्वाची भूमिका मांडताना मागील काही दिवसांपासून भाजपने लावून धरलेल्या मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्याला हात घातला. राज ठाकरे यांनी त्यावेळी मशिदींवरील भोंगे उतरवा अन्यथा आम्ही त्यासमोर लाऊड स्पीकरवर हनुमान चालिसा लावू, असे म्हटले होते. यानंतर समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा थेट इशारा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिला आहे.

“गृहमंत्र्यांनी आम्हाला दम देण्यापेक्षा कायद्याचं पालन करावं. सन्माननिय उच्च न्यायालयाने काय भूमिका घेतलीय की, भोंगे उतरले पाहिजेत. त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. आम्हाला दम देणार, आमच्यावर कारवाई करणार. कारवाईला कोण महाराष्ट्र सैनिक घाबरत नाही. आम्हाला काय फरक पडत नाही त्या कारवाईचा. मूळात विषय असाय की आम्ही सांगतोय कायद्याचं पालन करायचा. ते पहिलं गृहमंत्र्यांनी करावं आणि मग आम्हाला दम द्यावा,” असं मनसेचे चिटणीस संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT