Pune News : पुणे महापालिका निवडणुकीत मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्रित निवडणूक लढल्यास राजकीय समीकरण बदलणार आहेत. दोन्ही पक्षांची कमी जास्त प्रमाणात शहरातील प्रत्येक प्रभागात ताकद आहे. 2017 साली झालेल्या निवडणुकी मधील आकड्यांचा विचार केल्यास हे दोन्ही पक्ष आगामी महापालिका निवडणूक एकत्र लढल्यास 46 जागांवर सकारात्मक परिणाम येऊ शकतात असे चित्र दिसून येत आहे.
राज्यातील हिंदी भाषा सक्तीचा जीआर रद्द केल्याबाबत मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विजय मेळावा आयोजित केला होता.या मेळाव्यात मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे एकत्र आले होते. या मेळाव्यात एकत्र आलोय आणि पुढे देखील एकत्र राहणार असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. तरी याबाबत राज ठाकरे यांनी कोणतीही भूमिका अद्याप स्पष्ट केली नाही.
मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही पक्ष आगामी महापालिका निवडणुकीत एकत्र लढल्यास नेमकी काय समीकरण होऊ शकतात याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत.
शिवसेनेमधील फूटीनंतर पुण्यातील शिवसेनेचे माजी नगरसेवक नाना भानगिरे हे एकनाथ शिंदेंच्यासोबत गेले. तर उर्वरित 10 पैकी 9 माजी नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. मात्र अलीकडेच, ठाकरेंच्यासोबत असलेल्या नगरसेवकांपैकी पाच माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर एका माजी नगरसेवकाने विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
मनसेची माजी नगरसेवक वसंत मोरे आधी वंचितच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढले त्यानंतर त्यांनी शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. परिणामी, सध्या उद्धव ठाकरेंकडे 2017 मधील केवळ lrv माजी नगरसेवक, तर मनसेकडे १ माजी नगरसेवक शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर, मराठी मतांचे पुन्हा विभाजन टाळण्यासाठी मनसे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात युती झाली, तर त्याचा स्पष्ट राजकीय फायदा दोन्ही पक्षांना मिळू शकतो.
पुणे महापालिकेच्या 2012 च्या निवडणुकी मध्ये नगरसेवकांच्या 152 इतकी होती त्यामध्ये सर्वाधिक नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे 52 इतके होते. त्यानंतर काँग्रेसचे 29, भाजपचे 26, मनसेचे 28, शिवसेनेचे 15 आणि आरपीआयलाने 2 दोन जागांवरती विजय मिळवला होता.त्यावेळी पालिकेत राष्ट्रवादी कॉग्रेस आणि कॉग्रेस यांच्या आघाडीची सत्ता होती.
2017 च्या निवडणुकीत मात्र सर्व समीकरणे बदलल्याच पाहायला मिळाले. भाजप आणि आरपीआय युती 97 जागा जिंकत एक हाती सत्ता मिळवली त्यांच्या खालोखाल राष्ट्रवादी – 39, शिवसेनेला 10, काँग्रेसला 9 आणि मनसेला 2 जागांवरती समाधान मानावे लागले.
मात्र या 2017 च्या निवडणुकीत शिवसेनेचे तब्बल 30 उमेदवार आणि मनसेच्या 16 उमेदवारांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. म्हणजे तब्बल 46 जागा या दोन्ही पक्षांनी काही मतांच्या अंतराने गमावल्या होत्या. याच मतदारसंघांमध्ये दोन्ही पक्षांच्या मतांची बेरीज केल्यास बहुतांश ठिकाणी दोन्ही पक्षांचे उमेदवार विजयी होऊ शकले असते अशी गणितं पाहायला मिळत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.