Raju Shetty Criticized on Narendra Modi
Raju Shetty Criticized on Narendra Modi 
पुणे

दिवे लावण्याचे आवाहन हा खुळचटपणा : राजू शेट्टी

संपत मोरे

पुणे : "दिवे लावण्यापेक्षा शांतपणे घरी बसा. घराच्या बाहेर पडू नका, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करायला हवे होते. दिवे लावा म्हणणे खुळचटपणा आहे. अजूनही काही लोक विनाकारण बाहेर पडतात. त्यांना घरात बसण्याचे आवाहन मोदींनी करायला हवे होते."असे मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी 'सरकारनामा' शी बोलताना व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ''देशातील  १३० कोटी भारतीयांनी ५एप्रिल ला रात्री नऊ वाजता नऊ मिनिटे घरातील सर्व दिवे बंद करुन एक दिवा, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च किंवा बॅटरी लावण्याचे आवाहन केलं. त्यावर शेट्टी यांनी टिका केली आहे.

"लॉक डाऊन अधिक सक्षमपणे राबवणे गरजेचे आहे. अजून काही लोक घराच्या बाहेर पडतात. त्यांना घराच्या बाहेर पडू नका. घरात बसा हे आवाहन मोदींनी कळकळीने करायला हवे होते. मात्र तसे न करता त्यांनी दिवे लावण्याची नवीन कल्पना लोकांना सांगितली आहे. दिवे लावून कोरोना कसा जाणार? लोकांनी घरात बसूनच कोरोना जाणार आहे."असे शेट्टी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT