रामदास आठवले सरकारनामा
पुणे

रामदास आठवले म्हणाले; पुण्याच्या महापौरपदाचा फडणविसांनी शब्द दिलाय

पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजपाला गेल्यावेळीपेक्षा यावेळी ‘आरपीआयची’ अधिक गरज लागणार आहे.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : येत्या महानगरपालिका निवडणुकीत यश मिळाल्यानतंर महापौर पदाकरता जर अनुसूचित जातीचे आरक्षण पडले तर हे पद ‘आरपीआय’ला दिले जाईल, असे आश्वासन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देंवेद्र फडणवीस यांनी दिले आहे, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आज पुण्यात सांगितली.

पुण्यात बोलताना आठवले यांनी ही माहिती दिली. महापालिकेच्या निवडणुकीत यश मिळाल्यास पुणे महापालिकेत ‘आरपीआय’ पक्षाचा महापौर होईल. याकरता देंवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला आहे. त्यासाठी आरक्षणात अनुसूचित प्रवर्गाचे आरक्षण यायला हवे, असे त्यांनी स्पष्ट केले.

पक्षाच्या युवक आघाडीच्यावतीने पुण्याच्या उपमहापौर सुनीता वाडेकर यांचा नागरी सत्कार तसेच कोरोना योद्ध्यांचा सन्मान आठवले यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी बोलताना आठवले म्हणाले, ‘‘ मागील निवडणुकीत पुणे महापालिकेत भाजपसोबत राहुन महापालिकेत सत्ता मिळाल्यावर उपमहापौरपद आपल्याला मिळाले. येणाऱ्या निवडणुकीत आणखी चांगले काम करून सत्ता मिळवू.त्यानंतर जर अनुसूचित जातीचे आरक्षण पडल्यास महापौरपदाची संधी ‘आरपीआयला’ दिले जाईल, असे आश्वासन देंवेद्र फडणवीस यांनी दिले आहे’’

२०१४ च्या निवडणुकीपासून भारतीय जनता पार्टीबरोबर ‘आरपीआय’ने युती केली आहे. आठवले स्वत: केंद्रात गेली साडेसात वर्षे मंत्री आहेत. २०१७ च्या निवडणुकीत भाजपाने ‘आरपीआय’ला सोबत घेऊन निवडणूक लढविली आहे. त्या निवडणुकीत भाजपाला माठे यश मिळाले. तब्बल ९९ नगरसेवक निवून आले.त्यात आरपीआयचा वाटा होता. पाच वर्षाच्या काळात आरपीआयला उपमहापौरपद मिळाले.भाजपाने दिलेला शब्द पाळला.

आणखी सहा महिन्यांनी महापालिकेची निवडणूक आहे. या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस महाविकास आघाीच्या माध्यमातून एकत्र लढणार आहेत.त्यामुळे पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजपाला गेल्यावेळीपेक्षा यावेळी ‘आरपीआयची’ अधिक गरज लागणार आहे.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT