पुणे

रामदास आठवले म्हणतात, ""राज ठाकरे जबाबदार नेते त्यांच्या तोंडी गोळ्या घालण्याची भाषा शोभत नाही ! 

सरकारनामा ब्युरो

पुणे : तबिलगी मरकजच्या कार्यक्रमावर संताप व्यक्त करनाता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गोळ्या घालण्याची केलेली भाषा असंवैधानिक आहे असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. त्यांच्या सारख्या जबाबदार नेत्याच्या तोंडी अशी भाषा शोभत नाही असेही त्यांचे म्हणणे आहे. 

देशातील कोरोनाच्या संकटाचा सामना करणाऱ्या डॉक्‍टर्स, नर्स आणि पोलिसांचे कौतुक करतानाच राज ठाकरे यांनी दिल्लीमधील निझामुद्दीन येथील तबिलगी मरकजच्या कार्यक्रमावर बोलताना धक्कादायक विधान केले होते.

रुग्णालयात मरकजच्या सदस्यांकडून डॉक्‍टरांना दिल्या जाणाऱ्या असभ्य वागणुकीवर बोलताना त्यांनी मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे असे धक्कादायक विधान केले होते. यावर आठवले यांनी ट्‌विट करून राज यांच्या विधानाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. 

आठवले यांनी आपल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे, की राज ठाकरे यांनी गोळ्या घालण्याची केलेली असंवैधानिक भाषा त्यांच्या सरख्या जबाबदार राजकीय नेत्याला शोभत नाही.

तबलिगिंनी केलेल्या गर्दीचे आम्ही समर्थन करीत नाही त्या प्रकरणी चौकशी आणि कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. गोळ्या घालायच्यात तर पाक मधील अतिरेक्‍यांना घाला. 

दरम्यान, राज यांच्यापाठोपाठ त्यांचे बंधू आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही नोटांना थुंकी लावणाऱ्यांना लक्ष करीत टीका केली होती. मात्र राज यांच्या गोळ्या घालण्याचे विधान अनेक नेत्यांना पटले नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT