Abhinav Deshmukh-Dr. Neelam Gorhe
Abhinav Deshmukh-Dr. Neelam Gorhe Sarkarnama
पुणे

बलात्कारातील आरोपीला फाशीची शिक्षा; डॉ. गोऱ्हेंनी थोपटली देशमुखांची पाठ

सरकारनामा ब्यूरो

पुणे : अल्पवयीन मुलीला पैसे आणि खाऊ देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील पानशेत भागातील आरोपीला फाशीची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. या प्रकरणात तातडीने तपास करीत आरोपीला फाशीच्या शिक्षेपर्यंत नेणाऱ्या पुण्याचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख (Abhinav Deshmukh) यांचे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr.Neelam Gorhe) विशेष अभिनंदन केले आहे.

ही घटना १५ फेब्रुवारी २०२१ रोजी पानशेत जवळील कुरण खुर्द (ता. वेल्हे) या गावात घडली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक देशमुख यांनी तातडीने तपास करीत आरोपी संजय बबन काटकर वय ३८ (रा.कादवे, कातकरी वस्ती ता. वेल्हे) अधीक्षक देशमुख यांच्या सहकाऱ्यांनी आरोपीस ४८ तासात अटक केली होती. त्यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता.आरोपीला अटक करून फाशीच्या शिक्षा होण्यासाठी आणि मुलीला न्याय देण्यासाठी काम करणारा प्रत्येक अधिकारी, कर्मचारी, सरकारी अभियोक्ता विलास पठारे, तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांचे डॉ. गोऱ्हे यांनी अभिनंदन केले आहे.

हा खटला न्यायालयात गेल्यानंतर सुनावणी झाली. साक्षी-पुरावे झाले.न्यायालयाने सोमवारी (ता.२८) आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. पोलिसांनी केलेली तातडीने केलेला तपास व आरोपीला केलेली अटक, योग्य तपास व सादर केलेले साक्षी पुरावे न्यायालयात सिद्ध झाल्याबद्दल डॉ.गोऱ्हे यांनी समाधान व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT