पुणे

Dhangekar on Mohol: "महापौर असताना मोहोळ बिल्डरची कार वापरत होते"; धंगेकरांचे खासदारांवर पुन्हा एकदा गंभीर आरोप

Dhangekar on Mohol: बिल्डरच्या गाडीवरून मोहोळ धंगेकर यांच्या वादामध्ये आणखीनच भर पडली आहे.

Amit Ujagare

Dhangekar on Mohol: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे महापौर असताना खासगी बिल्डरच्या नावावर असलेली गाडी वापरत होते, याच बिल्डरने जैन बोर्डिंगच्या व्यवहारात निविदा भरली होती असा आरोप शिवसेनेचे महानगरप्रमुख, माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. तर ‘निवडणुकांमध्ये पराभूत झाल्याने ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळं ते रोज उठून काहीही आरोप करतात, त्यांच्यावर जमीन बळकावल्याचे गुन्हे आहेत,’’ अशा शब्दांत मोहोळ यांनी शुक्रवारी त्यांना प्रत्त्युत्तर दिले. जैन बोर्डिंगच्या भूखंड खरेदीवरून या दोन्ही नेत्यांमध्ये वाद सुरु असताना त्यात आणखी भर पडली आहे.

मॉडेल कॉलनी येथील जैन बोर्डिंगचा तीन एकराचा भूखंड गोखले लॅंडमार्क एलएलपी या कंपनीने २३० कोटी रुपयांना खरेदी केला आहे. यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांची भागीदारी असल्याचा आरोप झाला. पण मोहोळ यांनी मी मंत्री झाल्यानंतर या कंपनीच्या भागीदारीतून बाहेर पडलो असून, या व्यवहाराचा माझा काही संबंध नाही असा खुलासा केला आहे. त्यानंतरही धंगेकर यांनी या प्रकरणावरून मोहोळ यांना लक्ष्य केले आहे. धंगेकर यांनी मोहोळ हे महापौर असताना बढेकर बिल्डरची गाडी वापरत होते, हे नीतिमत्तेला धरून आहे का? असा प्रश्‍न विचारत त्यांचा जुना व्हिडिओही व्हायरल केला.

मुरलीधर मोहोळ यांनी धंगेकर यांच्या या आरोपांना उत्तर दिले. ते म्हणाले, ‘‘मी पुण्याचा असा पहिला महापौर आहे की ज्याने स्वतःची गाडी वापरली. माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात माझ्या भागिदारीबद्दल स्पष्ट माहिती दिली आहे. मी स्वतःची गाडी वापरली, माझं इंधन वापरले. एक विकृत मनोवृत्तीचा माणूस रोज काही तरी बोलतो, त्यांना पुरावे मागा. त्यांच्यावर कोथरूडमध्ये जमीन बळकावयचा, वक्फ बोर्डाची जमीन हडपल्याचे गुन्हे दाखल आहेत. निवडणुकीच्या प्रचारात मी त्यांच्यावर एकदाही बोललो नाही, त्यामुळं आताही मला त्यांच्याबद्दल काही बोलायचे नाही’’

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT