Ravindra Dhangekar Vs BJP Ganesh Naik sarkarnama
पुणे

Ravindra Dhangekar : पत्नी, मुलाच्या पराभवाच्या धक्क्यातून रवींद्र धंगेकर सावरले, भाजप मंत्र्याला दिली थेट कुत्र्याची उपमा; मोठा वाद पेटणार!

Ravindra Dhangekar Vs BJP Ganesh Naik : रवींद्र धंगेकर हे पुन्हा अ‍ॅक्टिव्ह झाले असून त्यांनी थेट भाजच्या मंत्र्‍याला टार्गेट केले आहे.

Sudesh Mitkar

Pune News : पुणे महापालिका निवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकर यांना दुहेरी धक्का बसल्याचे पाहायला मिळाले.पत्नीचा आणि मुलाचा पराभव झाला. तसेच त्यांच्या नेतृत्वात लढले गेलेल्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत शिंदे सेनेचा दारुण पराभव झाला त्यांना एकही जागा जिंकता आली नाही.

या मोठ्या पराभवाच्या धक्क्यातून सावरत रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासाठी मैदानात उतरले आहे. भाजप नेते, मंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार शिंदे यांच्यावर सडकून टीका केली होती. त्याला धंगेकरांनी प्रत्युत्तर दित गणेश नाईकांना थेट कुत्र्याची उपमा दिली आहे. याबाबतची पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

धंगेकरांनी केलेल्या पोस्टमधील फोटोमध्ये एकनाथ शिंदे हे रथावर स्वार दाखवण्यात आले आहेत. तर भाजप नेते, मंत्री गणेश नाईक यांचा चेहरा लावलेला कुत्रा भुंकताना दाखवण्यात आला आहे. त्यावर कॅप्शन देण्यात आलं आहे की, 'कुत्र्याने आपल्या दगडाच्या खाणी राखाव्यात, पैसा ओरबाडावा..! विकासाच्या रथाबरोबर स्पर्धा करण्याची त्याची लायकी नाही ..'

महापालिका निवडणूकीच्या निकालानंतर पराभवामुळे शांत असलेले धंगेकर भाजपच्या मंत्रावर टीका करण्यासाठी जागृत पाहायला मिळाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप विरुद्ध धंगेकर हा संघर्ष सुरू होण्याची चिन्हे आहेत.

काय म्हणाले होते गणेश नाईक?

नवी मुंबईतील भूखंड वाटप प्रकरणावरून वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नगरविकास खात्यावर तीव्र टीका केली. नाईक म्हणाले होती की, नवी मुंबई महापालिकेसाठी रुग्णालये, उद्याने आणि इतर सार्वजनिक सुविधांसाठी आवश्यक असलेले भूखंड मागितले होते, पण ते भूखंड सिडकोकडून मिळण्याऐवजी दलालांच्या माध्यमातून बिल्डरांच्या फायद्यासाठी वळवले गेले. वरिष्ठांनी मला लीड करण्याची परवानगी दिली तर एकनाथ शिंदेंच्या कल्याणमधील पुत्राला माजी खासदार करेल. या पिता-पुत्र बक्कासुर आहेत. त्यांनी राज्याला 10 वर्ष मागे नेले आहे.

श्रीकांत शिंदे यांचे प्रत्युत्तर

श्रीकांत शिंदे यांनी पलटवार करताना म्हटले, "वयानुसार आजार येतातच. विसरभोळेपणा, चिडचिडेपणा, दिशाभूल होणे असे आजार वयाबरोबर येणे स्वाभाविक आहे. हे मी चांगल्या प्रकारे सांगू शकतो, कारण मी स्वतः डॉक्टर आहे. मात्र मला 'माजी खासदार' करण्याचे वक्तव्य त्यांनी करू नये. जर खूपच खुमखुमी असेल, तर ठाणे किंवा कल्याण लोकसभा मतदारसंघातून कुठूनही त्यांनी किंवा त्यांच्या मुलाने निवडणूक लढवून दाखवावी. मी त्यांच्यासमोर उभा राहीन.लोकांनी मला तीन वेळा निवडून दिले आहे.तुम्ही शिंदे साहेबांच्या नादी लागाल, मात्र श्रीकांत शिंदे यांच्या नादी लागू नका.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT