Ravindra Dhangekar On Girish Bapat's Demise: Pune News
Ravindra Dhangekar On Girish Bapat's Demise: Pune News  Sarkarnama
पुणे

Ravindra Dhangekar On Girish Bapat's Demise : गिरीश बापटांना धंगेकरांची श्रद्धांजली; म्हणाले, "कणखर नेतृत्व.."

सरकारनामा ब्यूरो

Pune News : पुण्याचे खासदार व माजी पालकमंत्री गिरीश बापट (वय ७३) यांचे प्रदीर्घ आजारामुळे आज (बुधवारी) निधन झाले. आज सांयकाळी सात वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सांगितले. पुण्याच्या राजकारणात ‘भाऊ’ म्हणून ओळखले जाणारे गिरीश बापट (Girish Bapat Death) यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते.

गिरीश बापट यांच्या निधनानंतर राजकीय व सामाजिक विश्वातून अनेक मान्यवरांनी, नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. गिरीश बापट ज्या विधानसभा मतदारसंघातून सलग पाचवेळा निवडून गेले होते, त्या कसबा पेठ मतदारसंघातून नुकतेच पोटनिवडणुकीत निवडून गेलेले महाविकास आघाडी पुरस्कृत आणि काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी गिरीश बापट यांना श्रद्धांजली व्यक्त केली.

पुण्याचं कणखर नेतृत्व, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या आत्म्यास शांती लाभो, असे म्हणत धंगेकर यांनी बापटांना श्रद्धांजली व्यक्त केली आहे. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत बापट यांनी आपल्या पक्षासाठी प्रचार कले होते. कसब्यातून धंगेकर निवडून आल्यानंतर धंगेकरांनी बापटांची भेट घेतली होती. निवडणूक विरोधात असली तरी, बापटांची अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी भेट घेतली होती.

गिरीश बापट यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे. बापट यांचे पार्थिव दुपारी २ ते ६ वाजेपर्यंत त्यांच्या शनिवार पेठतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.आज सांयकाळी सात वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT