Ravindra Dhangekar and Raj Thackeray
Ravindra Dhangekar and Raj Thackeray Sarkarnama
पुणे

Politics : धंगेकरांच्या राजकारणाचा अनोखा पॅटर्न; सकाळी खर्गे, नंतर 'मातोश्री'वर हजेरी अन् राज ठाकरेंचीही भेट

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : कसबा पोटनिवडणूक राज्याच्या राजकारणात चर्चेची ठरली. या निवडणुकीसाठी भाजपसह महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांनी कंबर कसली होती. भाजपचा गड मानला जाणाऱ्या कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला.

भाजपचे हेमंत रासने यांचा आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी पराभव केला. विजय मिळवल्यानंतर रवींद्र धंगेकर आता मुंबई दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली.

त्यानंतर 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर संध्याकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही शिवतिर्थावर जाऊन भेट घेतली. यावेळी धंगेकर यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकरही उपस्थित होत्या.

दरम्यान, रवींद्र धंगेकर यांनी २०१७ ला मनसे सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी कसबा पोटनिवडणूक लढवली. कसबा पोटनिवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. धंगेकरांचं काम करणाऱ्या काही मनसे पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी मनसेकडून करण्यात आली.

मात्र, तरी देखील पोटनिवडणुकीत विजय झाल्यानंतर धंगेकरांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे धंगेकरांच्या या अनोख्या राजकारणाच्या पॅटर्नची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT