Hemant Rasne Sarkarnama
पुणे

रासने यांनी केला विक्रम : स्थायी समितीच्या अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा निवड

स्थायी समितीमध्ये भाजपचे १०, राष्ट्रवादीचे चार, शिवसेना व काँग्रेसचे प्रत्येकी एक असे एकूण १६ सदस्य आहेत.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पुणे महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष हेमंत रासने (Hemant Rasne) यांनी सहा विरूद्ध १० मते मिळवत स्थायी समितीचे अध्यक्षपद सलग चौथ्यांदा पटकावले.राष्ट्रवादीचे उमदेवार प्रदीप गायकवाड यांना सहा मते मिळाली.

स्थायी समिती अध्यक्षपदाची मुदत २८ मार्च रोजी संपली आहे. महापालिकेची मुदत १४ मार्च रोजी संपणार आहे. त्यासाठी एक मार्च ते १४ मार्च या १४ दिवसांसाठी नवे स्थायी समिती अध्यक्ष निवडले गेले आहेत. एक मार्च रोजी उमेदवारी अर्ज भरण्यात आला, त्यानंतर आज सकाळी महापालिकेत निवडणूक झाली. पीएमपीचे व्यवस्थापक संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपस्थित होते.

स्थायी समितीमध्ये भाजपचे १०, राष्ट्रवादीचे चार, शिवसेना व काँग्रेसचे प्रत्येकी एक असे एकूण १६ सदस्य आहेत. त्यामुळे रासने यांची निवड ही औपचारिकता होती. तरीही भाजपने दगाफटका होऊ नये यासाठी व्हीप काढला होता.रासने यांचा विजय निश्चित असल्याने शक्तिप्रदर्शन करण्यासाठी कार्यकर्ते जमा झाले होते. महापालिकेच्या बाहेर ढोलताशे वाजवून, घोषणाबाजी करून रासने यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

" पक्षाच्या नेत्यांनी मला सलग चौथ्या वेळी स्थायी समितीचे अध्यक्ष होण्याची संधी दिली प्रामाणिकपणे काम करणा-या कार्यकर्त्यांना तसा न्याय मिळतो हे याचे उदाहरण आहे पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद स्थायी समिती कधी बरखास्त होत नाही त्यामुळे अर्थसंकल्प सादर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे रासने यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT