MNS
MNS Sarkarnama
पुणे

'पाकिस्तान जिंदाबाद'ला 'हर हर महादेव'ने प्रत्युत्तर : पुण्यात मनसे आक्रमक!

सरकारनामा ब्यूरो

पुणे : 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या कथित घोषणांवरून आता रस्त्यावरील राजकारण तापत आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी 'पाकिस्तान जिंदाबाद' घोषणा दिल्याच्या कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता मनसेने पुण्यात जोरदार आंदोलन केले. 'हर हर महादेव' अशा घोषणा देत पुण्यातील अलका टॉकीज चौकात हे आंदोलन करण्यात आले.

'दूध मांगोगे तो खीर देंगे, भारत मांगोगे तो पाकिस्तान को चिर देंगे' अशा आक्रमक घोषणा देत मनसे कडून आंदोलन करण्यात आले. यावेळी पाकिस्तानचा राष्ट्रीय ध्वज मनसेकडून जाळण्यात आला. आंदोलनाच्या ठिकाणी अलका टॉकीज चौकात बंदोबस्तासाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला असून, याठिकाणीची परिस्थिती हातळण्याचं काम, पोलिसांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान पीएफआयच्या अटक केलेल्या आरोपींकडून अनेक गोष्टींचा उलगडा होत आहे. पीएफआयकडून मुस्लीम तरूणांची धर्मांधतेतून दिशाभूल केली जात असल्याची माहिती एटीएसच्या तपासात समोर आली आहे. भारताला २०४७ पर्यंत इस्लामिक राष्ट्र बनवण्याचं पीएफआयचं लक्ष्य असल्याचे एटीएसच्या तपासातून समोर आल्याचे, एटीएसने सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT