Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Pune NCP News : पुण्यात राष्ट्रवादीत ना'राजीनामा' सत्र सुरूच; आतापर्यंत अनेक पदाधिकाऱ्यांनी पद सोडले!

Pune NCP Deepak Mankar News : शहराध्यक्ष दीपक मानकर यांना विधानपरिषदेची संधी न दिल्यामुळे पदाधिकाऱ्यांची मोठ्याप्रमाणात नाराजी

Sudesh Mitkar

Pune Ajit Pawar NCP and Deepak Mankar : पुणे शहरातील अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांना विधान परिषदेची संधी नाकारल्याने शहर राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरले आहे. शहरातील जवळपास ८०० पदाधिकाऱ्यांनी पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर येत असून शनिवार पर्यंत ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या सदस्य पदावरती पुण्यातून शहराध्यक्ष दीपक मानकर(Deepak Mankar) यांची वर्णी लागावी यासाठी पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांची भेट घेऊन मागणी केली होती. आचारसंहिता लागण्यापूर्वी सात नावांची घोषणा करण्यात आली त्यांना शपथ ही देण्यात आली मात्र त्यामध्ये दीपक मानकर यांचं नाव नसल्याचे समोर आले. यानंतर नाराज झालेल्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचे सत्र सुरू केले आहे.

तत्पूर्वी शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी देखील पत्रकार परिषद घेत आपणही शनिवार पर्यंत शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याचं स्पष्ट केला आहे. इतर देखील पर्याय उपलब्ध आहेत मात्र आपण अजित पवारांसोबतच(Ajit Pawar) राहणार असल्याचा देखील त्यांनी सांगितलं.

दीपक मानकर यांच्याकडून शनिवारी एक बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीनंतर दीपक मानकर हे आपला शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देणार आहेत. यावेळी आणखी पदाधिकारी देखील राजीनामा देणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

याबाबत मानकर म्हणाले, "पक्षफुटीनंतर नव्या जोमाने पक्ष व संघटना बांधणीचे काम आम्ही प्रामाणिकपणे केले. १६०० जणांची जम्बो कार्यकारिणी तयार केली. विविध कार्यक्रम घेऊन पक्षाला सर्वसामान्यांपर्यंत पोचवले. असे असताना, पक्षाने संधी न दिल्याची सल कार्यकर्त्यांच्या मनात आहे. पक्षाने मला ताकद दिली, तर कार्यकर्त्यांना ताकद मिळणार आहे, याचा पक्षाला विसर पडत आहे.' अशा शब्दात दीपक मानकर यांनी नाराजी व्यक्त केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT