डी. के. वळसे पाटील
Manchar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केल्यानंतर अजित पवार आठ आमदारांसह शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. याचवेळी अजितदादांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर उर्वरित आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर राज्यातील सत्तासमीकरणं बदलली आहेत. यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याचदरम्यान, भाजप नेते व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे यांनी अचानकपणे शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची भेट घेतली.
राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrishna Vikhe Patil) हे राज्यातील राजकीय भूकंपानंतर पहिल्यांदाच शनिवारी (दि.८) अचानकपणे शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या भेटीला आले. दोन्ही नेत्यांमध्ये बराचवेळ चर्चा झाली. मात्र, या भेटीत नेमकं काय झालं हे सध्या गुलदस्त्यात असून उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.
राज्य मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्या समावेत आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचे दिलीप वळसे पाटील यांनी नुकतीच कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. वळसे पाटील रविवारी (दि.९) मंचरला येणार आहे. त्यांचेही आपण स्वागत करणार असल्याचे आढळराव पाटील यांनी यापूर्वी सांगितले आहे. या दोन जुन्या मित्रांची मैत्री पुन्हा बहरणार अशीच तालुक्यात चर्चा आहे.
लांडेवाडी येथे विखे पाटील यांचे फटाके वाजवून आढळराव पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. विखे पाटील यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. विखे पाटील यांचा सत्कार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भगवानराव पोखरकर, उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे , रवींद्र करंजखेले , संतोष डोके, राम तोडकर, अशोक बाजारे, सचिन बांगर,शिवाजीराव राजगुरू, अशोक थोरात, सरपंच संगीता शेवाळे, तुकाराम काळे,अजित चव्हाण, भाजपचे युवक नेते बाबू थोरात यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी केले.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.