Pune : राज्याच्या भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीत वाढ होऊ लागली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून फलक झळकल्यानंतर आता पवार कुटुंबीयातील आमदार रोहित पवारांच्या नावाची भर पडली आहे.
विधानसभा निवडणुकीला दीड वर्षाचा अवधी आहे. महाविकास आघाडीने आतापासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीतील पक्षाच्या नेत्यांचे आतापासूनच भावी मुख्यमंत्री म्हणून फलक झळकू लागले आहेत.
शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना शुभेच्छा देताना त्यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आला आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर लागलेले हे फ्लेक्स सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. रोहित यांच्या समर्थकाने वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे हे फ्लेक्स झळकवले आहेत.
"अजित पवारांची जागा रोहित पवारांना घ्यायची आहे," असे अजितदादा गटातील नेते सुनील तटकरे यांनी नुकतेच म्हटलं होते. या पार्श्वभूमीवर रोहित पवारांच्या या फलकाची चर्चा रंगली आहे.
अजित पवार, सुप्रिया सुळेंनंतर पवार कुटुंबीयातून रोहित पवारही 'भावी मुख्यमंत्री'च्या रांगेत आहेत का, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. ज्येष्ठ नेत्यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री म्हणून केला जाणे हे आपण समजू शकतो, पण पहिल्यांदाच आमदार झालेल्या रोहित पवारांचा भावी मुख्यमंत्री म्हणून केलेल्या उल्लेखामुळे राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Edited By : Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.