Beed News: बीड आणि परभणी प्रकरणामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावरुन राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
सरपंच संतोष देशमुख हत्येतील आरोपी विष्णू चाटे याचा मोबाईल सापडला तर सर्वकाही समोर येणार आहे,परंतु या आरोपीचा मोबाईल अजूनही सापडत नाही. विरोधकांचे फोन क्षणार्धात टॅप करू शकणाऱ्या यंत्रणेला आरोपीच्या मोबाईलचा साधा CDR सुद्धा का मिळत नाही? हे पोलीस यंत्रणेचे आणि पर्यायाने गृहमंत्र्यांचे अपयश नाही का? असा सवाल रोहित पवारांना x वर उपस्थित केला आहे.
बीड आणि परभणी दोन्ही प्रकरणात तपास एका पॉइंटला येऊन थांबला असून तपास आता गती घ्यायला तयार नाही. बीड प्रकरणात सभागृहात मुख्यमंत्र्यांनी न्यायालयीन तपासणी करण्याची घोषणा करुन २५ दिवस झालेत पण अद्यापही समिती कार्यान्वित होऊ शकलेली नाही. सरकार पुरावे नष्ट होण्याची वाट पाहत आहे का? असे रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
राज्यकर्त्यांनी मिळमिळीत भूमिका बघता जनतेचा कायदा सुव्यवस्थेवरचा विश्वास दिवसेंदिवस कमी होत असल्याने देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपली कार्यक्षमता तर अजितदादांनी आपला निडरपणा दाखवायला हवा. वजीराच्या बेशिस्त प्याद्याला वाचवण्यासाठी राजानेच कायद्याची मोडतोड करून संपूर्ण राज्यालाच वेठीस धरायचे नसते आणि ते राज्याच्या हिताचेही नसते, याचे स्मरण मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांनी ठेवायला हवे, असा टोला रोहित पवारांनी मुख्यमंत्री फडणीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला आहे.
देशमुख हत्येप्रकरणाशी संबधीत अटकेत असलेला वाल्मिक कराड याला आज केज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. वाल्मिक कराड हा सध्या केंद्रीय गुन्हे अन्वेषणच्या (CID) कोठडीत आहे. त्याला आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्याच्या कोठडीत वाढ होणार की नाही, हे दुपारी समजेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.