Rohit Pawar- Praniti Shinde Sarkarnama
पुणे

Rohit Pawar : सोलापूर लोकसभेच्या जागेवरुन रोहित पवार प्रणिती शिंदेंना म्हणाले.."आपापसात वाद.."

Rohit Pawar replied Praniti Shinde : रोहित पवार यांनी टि्वट करीत या वाद संपवला आहे.

सरकारनामा ब्युरो

Rohit Pawar replied Praniti Shinde : सोलापूर लोकसभेची जागा कोणी लढवायची, यावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुंपली आहे. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यात शाब्दीक युद्ध रंगले आहे, त्यावर रोहित पवारांनी पडदा टाकला आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस उमेदवाराचा सलग दोन वेळा पराभव झाल्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा, ही जागा लढवण्यास राष्ट्रवादी सक्षम असल्याचा दावा राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे रोहित पवार यांनी नुकतेच सोलापूर दौऱ्यावर असताना केले होता.

त्यावर काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी कोण रोहित, असा सवाल करीत काही लोकांमध्ये पोरकटपणा असतो लवकरच त्यांना मॅच्युरिटी येईल असे उत्तर देत रोहित पवारांची मागणी फेटाळली आहे.

त्यानंतर सोलापुरात दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ऐकमेकांच्या विरोधात बॅनरबाजी सुरू केली. यावर अखेर रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. रोहित पवार यांनी टि्वट करीत या वाद संपवला आहे,

"प्रणितीताईंच्या वक्तव्यावरून नाराज झालेले कार्यकर्ते आपला राग व्यक्त करतायेत,पण कुणीही नाराज होऊ नये. त्या माझ्या मोठ्या भगिनी असून त्यांना बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळं आपापसात वाद न करता बेरोजगारी हा आजचा मुख्य प्रश्न सोडवण्यासाठी आपण आपली शक्ती खर्च करूया," असे रोहित पवार यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा अॅड कोमल साळुंखे (ढोबळे) यांनी दोन्ही आमदारावर गंभीर आरोप करीत टीका केली आहे. "महाराष्ट्र भिकेला लागला तरी माझा मतदार संघ शाबूत राहिला पाहिजे, अट्टाहास करणारी टोळी सक्रिय होताना दिसत आहे," असा आरोप साळुंखे यांनी केला आहे.

"पुढचा आमदार कोण असेल हे जनता ठरवेलच पण चालु आमदारांनी आपल्या आमदारकीत एखादा ऐतिहासिक निर्णय घ्यावा किंवा एखाद वर्षानुवर्ष रखडलेलं काम स्वतःच्या आमदारकीमध्ये पार पाडण्यात धन्यता मानावी. जेणेकरून आमदार हो न हो पण जनहिताच्या कामाने कायम जनतेच्या मनात राहण्याची जागा तरी कायम राखता येईल, अशा शब्दात बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ॲड. कोमल साळुंखे(ढोबळे) यांनी प्रत्युत्तर दिले आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT