Rohit Pawar Yuva Sangharsha Yatra :  Sarkarnama
पुणे

Rohit Pawar Yuva Sangharsha Yatra : रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेला पुण्यातून दणक्यात सुरुवात

NCP Politics : 13 जिल्हे, 42 दिवस असा प्रवास करून 7 डिसेंबर 2023 रोजी ही यात्रा नागपुरात पोहाेचेल

अनुराधा धावडे

Pune Political News : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेला आजपासून (24 ऑक्टोबर) सुरुवात झाली. तरुणांना भेडसावणाऱ्या आव्हानांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुणे ते नागपूर अशी 800 किलोमीटरची ही यात्रा असणार आहे. आजपासून (24 ऑक्टोबर) 42 दिवस, 13 जिल्ह्यांमधून ही यात्रा प्रवास करणार आहे. विशेष म्हणजे, या यात्रेत रोहित पवारांची पत्नी आणि मुलेही सामील होणार आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्याचे या यात्रेकडे लक्ष लागले आहे.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी कन्याकुमारी ते काश्मीर अशी 'भारत जोडो यात्रा' काढली होती. देशभरातून या यात्रेला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला. कन्याकुमारीपासून निघालेली ही यात्रा जवळपास तीन महिन्यांनी काश्मीरमध्ये पोहाेचली. त्यानंतर आता रोहित पवार पुणे ते नागपूर अशी यात्रा काढणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यातील युवकांच्या प्रश्नांबाबत रोहित पवार नेहमीच आक्रमक भूमिका मांडताना दिसतात. त्यात राज्य सरकारने काढलेली कंत्राटी भरती, पेपरफुटी या प्रकरणांवरून रोहित पवारांनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. त्यामुळे तरुणांना भेडसावणाऱ्या अनेक समस्या पाहून या यात्रेचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये कंत्राटी भरती आणि नागरी सेवा परीक्षांशी संबंधित तरुणांचे प्रश्न उपस्थित केले जाणार आहेत. आजपासून सुरू झालेली ही यात्रा 42 दिवसांचा प्रवास करून 7 डिसेंबरला नागपूरला पोहाेचेल. हिवाळी अधिवेशाच्या तोंडावरच ही यात्रा नागपुरात धडकणार आहे.

काय आहे युवा संघर्ष यात्रेचा उद्देश ?

यात्रेची घोषणा करताना रोहित पवार यांनी या यात्रेचे उद्दिष्ट काय आहे, यावरही भाष्य केले होते. "राज्यातील युवकांना संघटित करून त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी ही पदयात्रा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच, युवा पिढीच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना भविष्यातील अडचणींवर मात करण्यासाठी युवकांनी सुरू केलेली ही एक चळवळ आहे."

"राज्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. दुसरीकडे कंत्राटी भरतीचेही प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. राज्यात पेपरफुटीचेही प्रमाण वाढले आहे. अशा अनेक मुद्द्यांवर या यात्रेच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात येणार असल्याचे रोहित पवारांनी सांगितले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT