Rohit Pawar Latest News | Latest Political news marathi
Rohit Pawar Latest News | Latest Political news marathi Sarkarnama
पुणे

Rohit Pawar News : रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो साखर कारखान्याला दंड; भाजप आमदार राम शिंदेंनी दिली होती तक्रार

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Politics : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो साखर कारखान्याला साखर आयुक्तालयाने साडे चार लाखांचा दंड ठोठावला आहे. या प्रकऱणी भाजप आमदार राम शिंदे यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या वर्षीचा गळीत हंगाम 15 ऑक्टोबरला सुरू करण्याचे निर्देश दिले असतानाच आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कारखान्यात 12 तारखेपासून गळीत हंगाम सुरू केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.

भाजपचे आमदार राम शिंदे(Ram Shinde) यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो साखर कारखान्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती. याबाबतचे निवेदन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना शिंदेंनी दिले होते. यावेळी त्यांनी 15 ऑक्टोबरपूर्वी परवानगी न घेता साखर कारखाने सुरू केल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश असताना कारखाना सुरू केल्याबाबतची तक्रार राम शिंदे यांच्याकडून साखर आयुक्तांकडे करण्यात आली होती.

सरकारने ठरवून दिलेल्या तारखेच्या दोन दिवस अगोदर कारखाना सुरू केल्याप्रकरणी रोहित पवार यांच्या मालकीच्या बारामती ॲग्रो कारखान्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. याप्रकरणी कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष गुळवे यांच्याविरुद्ध भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चौकशी समितीकडून क्लिनचीट...

राम शिंदेंच्या तक्रारीनंतर साखर आयुक्तांनी याप्रकरणी चौकशी समिती नेमली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी चौकशी करून रोहित पवार(Rohit Pawar) यांना क्लिनचीट दिली. त्यानंतर त्या अधिकाऱ्यांचे नाव अजय देशमुख असून त्यांचं निलंबन करण्यात आलं. त्यानंतर सहकार विभागाकडे राम शिंदे यांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर आता पुन्हा एकदा व्यवस्थापकीय संचालक सुभाष गुळवे यांच्यावर भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी आता साखर आयुक्तांनी बारामती अॅग्रोला साडे चार लाखांचा दंड ठोठावला आहे.

काय आहे आरोप ?

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो या कारखान्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपचे आमदार राम शिंदे यांनी केली होती. राम शिंदे यांनी याबाबतचे निवेदन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना दिले होते. 15 ऑक्टोबरपूर्वी परवानगी न घेता साखर कारखाने सुरू केल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश असताना कारखाना सुरू केल्याबाबतची तक्रार राम शिंदे यांच्याकडून साखर आयुक्तांकडे करण्यात आली होती.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT