bondhu-baba 
पुणे

रोह्यातील भोंदूबाबाचे पुण्यात प्रताप 

रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्‍यातील खैरवाडी गावातील सोमनाथ चव्हाण या भोंदूबाबाने धमकावून पीडित महिलेंची फसवणूक व लैंगिक अत्याचार केले, जिवे मारण्याची धमकीहीदिली होती. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

सकाळवृत्तसेवा

रोहा : पुत्रप्राप्ती आणि गुप्तधन काढून देण्याच्या बहाण्याने एका भोंदूबाबाने एकाच कुटुंबातील पाच बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 22 जानेवारी ते 21 फेब्रुवारी या कालावधीत पिंपरीमध्ये घडलेल्या या घटनेबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. पिंपरी पोलिसांनी तातडीने कारवाई करत सोमनाथ कैलास चव्हाण (वय 32) याला ताब्यात घेतले. 

भोंदूबाबा मूळ रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्‍यातील खैरवाडी गावातील असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात अशा प्रकारे कुणाची फसवणूक झाली असल्यास "अंनिश'शी संपर्क साधण्याचे आवाहन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष मोहन भोईर यांनी केले आहे. भोंदूबाबाने धमकावून पीडित महिलेची फसवणूक केली. त्याबाबत कोणाला माहिती दिल्यास जिवे मारण्याची धमकीही दिली होती. 

तुमच्या घरात मूल जन्माला येऊ नये म्हणून नात्यातील एका बाईने घरातील सदस्यावर करणी केली आहे. तुमच्या घरात सात पेट्या धन, एक सोन्याची घागर आणि एक गणपतीची मूर्ती, असे गुप्तधन असून, घरातील एका मुलीचा जीव धोक्‍यात आहे, अशी भीती भोंदूबाबा सोमनाथ याने पीडितेच्या कुटुंबीयांना घातली होती. पुत्रप्राप्ती, गुप्तधन आणि मुलीचा जीव वाचवण्यासाठी घरात तीन उतारे व नग्नपूजा करावी लागेल. पूजेसाठी तीन लाख रुपये खर्च येईल व 11 हजार रुपये दक्षिणा लागेल. 15 दिवसांत उपाय न केल्यास कुटुंबातील सर्वांच्या जिवाला धोका आहे, असेही त्याने सांगितले होते. 

पीडित महिलेच्या कुटुंबीयांकडून पैसे उकळून तिच्यासह तिच्या पाच बहिणींना विधी करण्याच्या बहाण्याने एका खोलीत नेऊन दार बंद केले आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. झाल्या प्रकाराबाबत कोणास सांगितल्यास तुमच्या आई-वडिलांना दैवी शक्तीने व काळ्या जादूने मारून टाकीन, अशी धमकीही त्याने दिली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT