Mahesh Landge Sarkarnama
पुणे

Mahesh Landge News : भोसरीचे पैलवान लांडगे सकाळी सकाळीच पाच किलोमीटर चालले...

BJP and RSS : भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे हे 'आरएसएस'च्या गणवेशात सामील झाले.

उत्तम कुटे

Pimpri Chinchwad News : दसऱ्यानिमित्त 'आरएसएस' (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) ही देशभर पथसंचलन करते. पिंपरी-चिंचवडमध्ये ते यावेळी २५ ठिकाणी झाले. यावर्षी ही संख्या गतवेळेपेक्षा तीन पटीने वाढली. त्यात भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे हे 'आरएसएस'च्या गणवेशात सामील झाले. पाच किलोमीटर ते चालले. २०१६ ला संघाचा गणवेश हा हाफपॅन्टचा फुल पॅन्ट झाला तेव्हापासून आमदार लांडगे हे त्यात सहभागी होत आहेत.

यावेळी निम्या ठिकाणी सकाळी आठ वाजता 'आरएसएस'च्या घोषाच्या तालावर शिस्तबद्ध पथसंचलन झाले. त्यात भोसरीत आमदार लांडगे हे आपल्या मतदारसंघातील संचलनात सहभागी झाले. उर्वरित ठिकाणी ते संध्याकाळी सहभागी होणार आहे, अशी माहिती संघाचे पिंपरी-चिंचवड महानगर कार्यवाह माहेश्वर मराठे यांनी `सरकारनामा`ला दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आकुर्डी, रावेत, हिंजवडी पूनावळे, वाकड थेरगाव, चिंचवड पूर्व -पश्चिम, पिंपरी, काळेवाडी, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, सांगवी, कासारवाडी, संत तुकारामनगर, आळंदी, मोशी, संभाजीनगर, चिखली, आळंदीत सकाळी, तर देहू, देहूरोड, दिघी, चऱ्होली, भोसरी, इंद्रायणीनगर येथे सायंकाळी सदंड संचलन होणार आहे,अशी माहिती पिंपरी-चिंचवड जिल्हा संघचालक विनोद बन्सल यांनी दिली.

आमदार लांडगे हे भोसरीतील संचालनात सकाळी सामील झाले. यावेळी ठिकठिकाणी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. 'भारत माता की जय', अशा घोषणा नागरिकांनी दिल्या. हे संचलन पाच किलोमीटर झाले.

तेवढे अंतर आमदार लांडगे हे पायी शिस्तबद्धपणे एखाद्या संघ स्वयंसेवकासारखे चालले. त्यात सहभागी होण्याचे त्यांचे हे आठवे वर्ष आहे. २०१६ पासून ते त्यात सामील होत आहेत. इतरवेळी फॉर्मल ड्रेसमध्ये असणाऱ्या महेशदादांचा आजचा लूक वेगळाच दिसत होता.

Edited by Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT