RTE Admission sarkarnama
पुणे

RTE Admissions Update: पालकांना मोठा दिलासा! आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांवर अर्ज भरण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

RTE Admissions Update: शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत अर्ज भरण्यास प्राथमिक शिक्षण विभागाने मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार पालकांना आता ३१ मार्चपर्यंत आपल्या पाल्यांचे ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत.

सरकारनामा ब्युरो

RTE Admissions Update: शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत अर्ज भरण्यास प्राथमिक शिक्षण विभागाने मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार पालकांना आता ३१ मार्चपर्यंत आपल्या पाल्यांचे ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत.

आरटीईनुसार २५ टक्के प्रवेशासाठी शिक्षण विभागाने एक किलोमीटरच्या अंतरातील शाळा निवडण्याची घातलेली अट उच्च न्यायालयाने रद्द केली. त्यानंतर प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आधी अर्ज भरलेल्या पालकांना पुन्हा अर्ज भरण्यासाठी, तसेच अर्ज न भरलेल्या पालकांना अर्ज भरण्याची संधी दिली आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आरटीई संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी एक किलोमीटरची अट रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे एक किलोमीटरच्या आतील शाळांची निवड करून अर्ज भरलेल्या पालकांना प्रवेशासाठी एक किलोमीटर, एक ते तीन किलोमीटर, तसेच तीन किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरील शाळा उपलब्ध झाल्या आहेत.  

यंदा या प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यातील आठ हजार ७०० शाळांमधून एक लाख १४ हजार ७८५ जागा प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या आहेत. या प्रक्रियेत बुधवारी सायंकाळपर्यंत जवळपास दोन लाख ७६ हजार ९५४ अर्ज दाखल झाल्याची माहिती आरटीई प्रवेशाच्या संकेतस्थळावरील आकडेवारीवरून समोर आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT