Pune News : भोंदू बाबा कॅप्टन खरात प्रकरणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांचं नाव आल्यानंतर त्यांना सुरुवातीला महिला आयोगाचं अध्यक्ष पद सोडावा लागलं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा देखील राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आणखीन एक धक्का चाकणकर यांना बसला असल्याचे बोलले जात आहे.
भोंदू बाबा कॅप्टन खरात प्रकरणानंतर रूपाली चाकणकर या पुन्हा एकदा ऍक्टिव्ह मोडमध्ये आले असल्याचं पाहायला मिळत आहे. दीड महिन्यांच्या ब्रेकनंतर त्यांनी नाशिक जिल्ह्यातील नांदूर या ठिकाणी त्यांनी कार्यकर्त्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली.
या बैठकीचे फोटो रुपाली चाकणकर यांनी स्वतः समाज माध्यमांवर पोस्ट केले असून "गोतावळ" असे कॅप्शन दिले आहे. मात्र, या बैठकीत नेमकी कोणत्या प्रकारची चर्चा झाली याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
दुसरीकडे राज्यभरात ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज लागताना पाहायला मिळत आहे. यात दौंड तालुक्यातील नांदूर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. या निवडणुकीत माजी राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे सख्खे बंधू संतोष बोराटे यांचा दारुण पराभव झाला आहे. हा देखील चाकणकर यांच्यासाठी धक्का मानला जात आहे.
या निवडणुकीत उमेदवार विशाल नरेंद्र थोरात यांनी तब्बल ३०४ मतांनी विजय संपादन करत सरपंचपदावर आपली मोहर उमटवली. त्यांच्या विजयामुळे स्थानिक पातळीवर मोठी राजकीय घडामोड घडल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, संतोष बोराटे यांच्या पराभवामागे स्थानिक पातळीवरील नाराजी, तसेच त्यांच्या कार्यपद्धतीबाबत मतदारांमध्ये निर्माण झालेला असंतोष हे प्रमुख कारण असल्याची चर्चा परिसरात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.