<div class="paragraphs"><p>Rupali chakankar&nbsp;</p></div>

Rupali chakankar 

 

Sarkarnama 

पुणे

महिला सुरक्षेसाठी चाकणकरांनी खोचला पदर; खासगी, सरकारी कार्यालयांना दिले आदेश

सरकारनामा ब्युरो

पुणे : राज्यातील महिलांच्या वाढत्या अत्याचाराच्या विरोधात राज्यसरकारने (State Government) आता कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali chakankar) यासाठी पदर खोचून तयार झाल्या आहेत. महिलांचे घरातच नव्हे तर सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी होणाऱ्या अत्याचारात वाढत आहेत. याच पार्श्वभुमीवर रुपाली चाकणकरांनी राज्यातील सर्व क्षेत्रीय, निमशासकीय आणि सर्व खासगी आस्थापनांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत.

कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित आणि पोषक वातावरण मिळणे आवश्यक आहे. काम करत असलेल्या महिलांवर वेगवेगळ्या प्रकारे दबाव टाकणे, अरेरावी करणे, दुय्यम वागणूक देणे आदी तक्रारी आयोगास प्राप्त होत आहे. कामाच्या ठिकाणी महिलांना त्रास दिल्याचे प्रकार घडत असतील तर, याबाबत महिलांनी तक्रार देण्यासाठी पुढे आले पाहिजे, यासाठी काही महत्त्वाच निर्णय घेण्यात आले आहेत.

तर ती संस्था टर्मिनेट केली जाईल

राज्यातील सर्व क्षेत्रीय, निमशासकीय आणि खासगी आणि ज्या संस्थामंध्ये १० पेक्षा जास्त सदस्य असतील, त्या सर्व आस्थापनांनी आपापल्या कार्यालयात अंतर्गत तक्रार निवारण समिती नेमणे अनिवार्य आहे. जर ही समिती रजिस्टर्ड नसेल, ज्या संस्थेत ही समिती नसेल तर ५० हजार रुपयांचा दंड आणि ती संस्था तात्काळ टर्मिनेट केली जाईल असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी दिला आहे.

आमच्या महिला आयोगाचे सदस्य प्रत्येक संस्था आणि आस्थापनांमध्ये या समितीची तपासणी करतील, कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे, असे यावेळी रुपाली चाकणकरांनी सांगितले. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी असलेल्या शौचालयांबाबतही त्यांनी भाष्य केले.

महिला स्वच्छता गृहांची अस्वच्छता

पुणे शहरातील कात्रज, स्वारगेट, हडपसर, कोथरुड या ठिकाणी असलेल्या एसटी स्टॅंड आणि पीएमपीएमएलच्या स्थानकांवर सार्वजनिक स्वच्छता गृहांची दयनीय अवस्था झाली आहे. महिलांच्या सार्वजनिक स्वच्छता गृहांची झालेली दयनीय अवस्था व अस्वच्छतेमुळे महिलांना त्याचा वापर करण्यास अनेक अडचणी येतात. हे पाहता आपण पीएमपीएमएलच्या स्थानिक अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहे.

तेजस्विनी बस पुन्हा सुरु करणार

त्याचबरोबर शहरात, महिलांसाठी तेजस्विनी बस सुरु करण्यात आल्या होत्या. त्या बस लॉकडाऊन काळात बंद पडल्या होत्या. त्या बसही लवकरात लवकर सरु करण्यासंबंधी चर्चा झाली असल्याची माहिती रुपाली चाकणकरांनी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT